सातारा : गुरुकुल शिक्षण संस्था कार्यालयात रात्री साडेआठच्या वेळी जबरदस्तीने घुसून कार्यालयाचे कुलूप तोडून कर्मचाऱ्यांना मारहाण करताना सचिन गरगटे व त्याचे अन्य सात सहकारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असून, ते ताब्यात घेण्यात आले आहे. गुरुकुल शिक्षण संस्थेचा ताबा घेण्याप्रकरणी गरगटे यांनी पोलिस ठाण्यात गेल्यावर्षी तक्रार केली होती. त्याचा तपास एलसीबीकडे वर्ग करण्यात आला होता. या तपासाकामी राजेंद्र चोरगे व अन्य चार साथीदारांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले होते. त्याचाच फायदा घेऊन सचिन गरगटे आपल्या साथीदारासमवेत रात्री आडेआठच्या सुमारास शाळेचा ताबा जबरदस्तीने घेण्यासाठी गेला. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना विरोध केला. त्यावेळी लाकडी दांडक्याने व हाताने त्या सर्वांनी मिळून मारहाण केली, असा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल झाला. दरम्यान, घटनेप्रसंगी शाळेचे सीसीटीव्ही सुरू असल्याने हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. पोलिसांना तपासाकामी हे सीसीटीव्ही फुटेज उपयोगात पडणार आहे. दरम्यान दि. ६ रोजी रात्री आडे आठच्या सुमारास दहा ते पंधरा जणांच्या जमावाने अचानक शाळेत घुसुन तोडफोड तसेच कर्मचाऱ्यांना दमदाटी केली होती. हा प्रकार सर्व पालकांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेऊन कथन केला होता. त्यानंतर काळी वेळातच पोलिसांनी संबंधित हल्लेखोरांवर दरोड्यांचा गुन्हा दाखल केला होता. शाळेत असलेल्या सीसीटीव्हीचय आधारे पोलिसांना भक्कम पुरावा मिळाला असून सीसीटीव्हीत दिसणारे चेहरे ओळखून त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून गुरुकुल शाळेतील वाद समोर आल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)सातारा येथील गुरुकुल स्कूलवर सोमवारी रात्री सचिन गरगटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला केला. त्यानंतर दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासादरम्यान शाळेच्या सीसीटीव्हीत हा धक्कादायक प्रकार कैद झाल्याचे समोर आले आले.
‘गुरुकुल’चे कार्यालय फोडताना हल्लेखोर
By admin | Published: March 10, 2017 10:47 PM