शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
2
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
3
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
4
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
6
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
7
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
8
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
10
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
11
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
12
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
13
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
14
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
15
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
17
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
18
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
19
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
20
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

काँग्रेस, सेना-भाजप युतीच्या जागावाटपाकडे लक्ष

By admin | Published: July 07, 2015 11:34 PM

विटा बाजार समिती निवडणूक : महायुतीचीही नजर; दोन दिवसात जागावाटपाबाबत बैठक

दिलीप मोहिते - विटा -खानापूर व कडेगाव तालुका कार्यक्षेत्र असलेल्या विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे धूमशान सुरू झाले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप व कॉँग्रेसने युती केली असून त्यांच्या जागावाटपाकडे दोन्ही तालुक्यांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया दि. १४ जुलैपर्यंत असल्याने येत्या दोन-तीन दिवसात जागावाटपाबाबत युतीची बैठक होण्याचे संकेत आहेत.बाजार समितीच्या १९ जागांसाठी ११६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीने जुनी शिवसेना, भाजप, रिपाइं, समतावादी पक्ष, शेतकरी संघटना यांना सोबत घेऊन महायुती केली आहे. या महायुतीचे नेतृत्व राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक यांच्याकडे आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुतीची सत्ता आणण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. दुसरीकडे आमदार अनिल बाबर यांची शिवसेना, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा भाजप व ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांच्या कॉँग्रेसची युती झाली आहे. या युतीत कडेगाव व खानापूर तालुक्याला किती जागा द्यायच्या, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या तीनही नेत्यांची येत्या दोन-चार दिवसात विट्यात बैठक होणार आहे. या बैठकीत कडेगावला १९ पैकी १० जागा मागणार असल्याचे मोहनराव कदम यांनी सांगितले आहे. मात्र कडेगावला दहा जागा दिल्यास त्यातील पाच जागा देशमुख यांना द्याव्या लागणार आहेत. अनिल बाबर यांनी खानापूर तालुक्याला नऊ जागांची तयारी दर्शविल्यास ते सभापती पदावर खानापूरचा हक्क अबाधित ठेवतील, असेही सांगितले जात आहे. १९ पैकी १० जागा घेणाऱ्या कडेगावातील नेते सभापती पदासाठी दोन ते अडीच वर्षाचा कार्यकाल ठरवतील, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. सभापती पदावर लक्ष ठेवूनच जागा वाटप निश्चित होणार आहे. म्हणूनच काँग्रेस, शिवसेना, भाजप युतीमधील नेत्यांनी दोन दिवसात बैठक आयोजित केली आहे. यामध्येच जागा वाटपाचा तोडगा निघण्याची शक्यता आहे.विरोधी महायुतीनेही युतीच्या जाग वाटप प्रक्रियेवर बारीक नजर ठेवली आहे.इच्छुकांकडून नेत्यांची मनधरणीइच्छुकांनी, उमेदवारीसाठी युतीच्या नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. त्यात नवीन चेहऱ्यांसह आजी-माजी संचालकांचाही समावेश आहे. शिवसेनेच्या जुन्या गटातील उमेदवारी दाखल केलेल्या काही उमेदवारांनी आ. बाबर यांच्याशी जुळवून घेण्याचे ठरविले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे महायुतीने सहभागी करून घेतलेले जुनी शिवसेना, भाजपचे उमेदवार अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत कोणती भूमिका स्वीकारतात, याकडेही दोन्ही तालुक्यांच्या नजरा लागल्या आहेत.