मिरज : रिपब्लिकन यूथ फोर्सतर्फे संत रोहिदास जयंतीनिमित्त मिरजेतील सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संघर्ष सफाई कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शरद सातपुते यांना सामजिक कार्यासाठी संत रविदास जननायक समाजरत्न पुरस्कार देण्यात आला.
माजी नगरसेविका ज्योती आदाटे, जयश्री कुरणे, ज्योती कांबळे, सरस्वती देसाई, आदमअली मुजावर, डॉ. सतीश साळे, यशवंत रोकडे, ॲड. अल्लाबक्ष काझी, सचिन जाधव, शकिल पिरजादे, विजय माळी, सचिन केरिपाळे, मधुकर नरके, सॅम्युअल पिटर, डॉ. चिदानंद सुतार, परशुराम कांबळे, बाळासाहेब पाटील यांनाही विशेष पुरस्कार देण्यात आला.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या आवाहनामुळे कार्यक्रम रद्द करून रिपब्लिकन यूथ फोर्स पुरस्कार समितीचे महेंद्र गाडे, युसुफ शेख, गणेश कांबळे, प्रकाश कांबळे, परशुराम कोळी, शाबुद्दीन शेख, सागर वाघमारे, सुभाष दबडे, गौतम कांबळे यांनी आपला सन्मान, आपल्या दारी या मोहिमेद्धारे सत्कारमूर्तींच्या घरी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला.