तांदूळवाडी : कणेगाव (ता. वाळवा) येथील वैशाली सचिन पाटील यांना दिल्ली येथे इंडियन अॅचिव्हज फोरम हा पुरस्कार मिळाला, तो सन २०२० मध्ये उद्भवलेल्या कोरोना या विषाणूबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे तसेच आरोग्य व पोषणासंबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शन केले. याचबरोबर व्यावसायिक क्षेत्रात पण त्यांनी काम केले आहे. कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. वैशाली पाटील यांना यापूर्वी दुबई संयुक्त अरब अमिरातमधील यूएईचा मराठी महिला हा पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, पुणे-मुंबई येथील नामांकित विद्यापीठांत विविध विषयांवर ज्ञान प्राप्त केले आहे. त्यांचे प्राथमिक विद्यालयाचे, महाविद्यालयाचे शिक्षण कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली वारणानगर येथे झाले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराने कौतुक होत आहे.
फोटो - १४०१२०२१-आयएसएलएम-वैशाली पाटील