पेठ येथील आत्मशक्ती पतसंस्थेचे ऑनलाइन वार्षिक सभेत अध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अभिजित पाटील, अंबादास पेठकर, शेखर बोडरे, प्रदीप पाटील, महादेव पाटील, डॉ. संजय पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : हणमंतराव पाटील यांनी आपले सर्व जीवन सामान्य लोकांच्या अडचणी आपल्या समजून त्या सोडविण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या स्मरणार्थ आत्मशक्ती पतसंस्थाच्या वतीने त्यांच्या नावाने पुढील वर्षापासून सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन आत्मशक्ती पतसंस्थाचे अध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी केले.
पेठ (ता. वाळवा) येथील आत्मशक्ती पतसंस्थेच्या ३३ व्या वार्षिक ऑनलाइन साधारण सभेत अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी युवा नेते अभिजित पाटील, उपाध्यक्ष अंबादास पेठकर, शेखर बोडरे, ज्येष्ठ संचालक प्रदीप पाटील, महादेव पाटील, डॉ. संजय पाटील, रवींद्र पाटील, जयवंत जाधव, संजय पाटील, अरुण कदम उपस्थित होते.
संस्थेचे जनरल मॅनेजर सजय दाभोळे यांनी अहवाल वाचन केले. एम. एस. पाटील यांनी आभार मानले.