सांगली : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांच्या जनजागृतीसाठी शासकीय व निमशासकीय विभागांमार्फत सांगली बस स्थानक येथे उभारण्यात आलेल्या प्रबोधनपर स्टॉलचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मुरलीधर मगदूम, डॉ. ज्ञानचंद्र पाटील, भास्कर मोहिते, चंद्रशेखर गोब्बी, के. आर. देशपांडे आदि उपस्थित होते.बस स्थानक सांगली येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली, वैधमापन शास्त्र यंत्रणा सांगली, परिवहन महामंडळ, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन विभाग, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग, भारत गॅस यांच्याकडून त्यांच्याकडे असलेल्या विविध योजनांची माहिती व ग्राहकांची जनजागृती करण्यासाठी स्टॉल उभारण्यात आले होते.
या स्टॉलची अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी पहाणी करून माहिती जाणून घेतली. यावेळी शाहिरी लोककला सांस्कृतिक विकास केंद्र मिरजवाडी पथकाच्या शाहीर अनिता खरात यांनी पोवाड्याच्या माध्यमातून ग्राहकांची जनजागृती केली. या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय व अशासकीय सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.