खुल्या जागांना संरक्षक भिंती उभारा
सांगली : महापालिका क्षेत्रात अनेक वॉर्डांमध्ये खुल्या जागा आहेत. मात्र, काही मोजक्याच जागांना संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या खुल्या जागांना संरक्षक भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
अपुरा वीजपुरवठा
सांगली : ग्रामीण भागामध्ये शेतीला भारनियमनाचा आजही फटका बसत आहे. महावितरणकडून देण्यात येणारा वीजपुरवठाही सुरळीत होत नाही. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विहिरी आणि कूपनलिकांमध्ये पाणी असूनही शेतकऱ्यांची पिके वाळत आहेत.
गटारे, रस्ता स्वच्छतेकडे दुर्लक्ष
सांगली : परिसरात नियमित गटारे आणि रस्त्याची स्वच्छता केली जात नाही. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी गटारीचे पाणी तुंबल्यामुळे ते रस्त्यावर येत आहे, याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत
सांगली : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या ठप्प झाल्या आहेत. पाऊस वेळेत नाही आला तर खरीप हंगाम वाया जाणार की काय, अशी शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. येत्या आठवडाभरात चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.