ढालगाव : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठलवाडी (ता. कवठेमहांकाळ) गावाजवळ नागज हद्दीत दुचाकी व टेंपोची समाेरासमाेर धडक हाेऊन झालेल्या भीषण अपघातात पिता-पुत्र जागीच ठार, तर मायलेकी गंभीर जखमी झाल्या. ही घटना बुधवार, दि. २३ राेजी दुपारी साडेतीन वाजता घडली. रोहन चिदानंद येनपे (वय २८) व मुलगा शुभम येनपे (७, सध्या रा. इंदिरानगर, सांगली, मूळ गाव नंदूर, जि. सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत, तर राेहन यांची पत्नी भाग्यश्री व मुलगी आरती ही किरकोळ जखमी झाले आहेत
बुधवारी दुपारी साडेतीनच्यासुमारास राेहन येनपे हे दुचाकीवरुन (क्र. एमएच १३ सीव्ही ३२७६) पत्नी व दोन्ही मुलांसह सांगोल्याकडून सांगलीला निघाले होते. याचवेळी टेंपो (क्र. एमएच १३ आर. ३२७९) हा मिरजेकडून पंढरपूरच्या दिशेने जात होता. विठ्ठलवाडी गावाजवळ उथळे पेट्रोल पंपाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक देऊन टेंपो सुमारे पाचशे मीटर अंतरावर जाऊन थांबला. अपघातात दुचाकीस्वार रोहन येनपे, मुलगा शुभम येनपे हे जागीच ठार झाले; तर राेहन यांची पत्नी भाग्यश्री गंभीर जखमी झाल्या. मुलगी आरती हिला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती नागजचे पोलीस पाटील दीपक शिंदे यांनी पोलिसांना दिली.
घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलीस करीत आहेत.
चौकट
घटनास्थळी विदारक चित्र
अपघात इतका भीषण होता की, रस्त्यावर विदारक चित्र हाेते. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. अपघातात दुचाकीचेही माेठे नुकसान झाले आहे.
फाेटाे : २३ ढालगाव १..२..३
ओळ : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर विठ्ठलवाडीनजीक टेम्पाेच्या धडकेत दुचाकीचा चक्काचूर झाला.