शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बाबूराव गुरव यांना खुनाची धमकी

By admin | Published: August 09, 2016 11:47 PM

सामाजिक क्षेत्रात तीव्र पडसाद : तासगावात आज बैठक; पोलिसांकडून बंदोबस्त

तासगाव : पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते, विद्रोही साहित्यिक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांना खून करून मारुन टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत तासगाव पोलिसांत तक्रार नोंद झाल्यानंतर, पोलिसांनी मंगळवारी धमकी देणाऱ्या अविनाश विठ्ठल थोरवत (वय २३, रा. वरचे गल्ली, तासगाव) याला ताब्यात घेतले. पोलिसांकडून डॉ. गुरव यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते शनिवारी तासगावात एकत्रित येणार आहेत. डॉ. बाबूराव गुरव यांचा मुलगा डॉ. विवेक गुरव यांना तासगावातीलच अविनाश थोरवत याने, तुझ्या वडिलांना ठेवत नाही, गोळ्या घालून ठार मारतो, अशाप्रकारे दमदाटी करुन धमकी दिली होती. गेल्या काही दिवसांपासून अशाप्रकारे सातत्याने धमकी देण्यात येत होती. एका लग्नसोहळ्यातही त्याने धमकी दिली होती. या घटनेनंतर शहरातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते एकत्रित आले. डॉ. विवेक गुरव यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयित थोरवत याला तातडीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्याने त्याची कबुलीही दिली.या घटनेचे सामाजिक क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले असून, डॉ. गुरव यांना दिलेल्या धमकीचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. या घटनेनंतर आमदार सुमनताई पाटील यांनी डॉ. गुरव यांची भेट घेतली. या घटनेबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याशीही फोनवर चर्चा केली. राज्यात यापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या झालेल्या हत्यांमुळे डॉ. गुरव यांना मिळालेल्या धमकीचा प्रकार गंभीर असल्याचे पडसाद उमटत आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि पुढील धोरण ठरवण्यासाठी बुधवारी तासगावात साडेअकराला सर्व पुरोगामी कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या घटनेनंतर सर्वच राजकीय पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. गुरव यांची भेट घेतली.कवठेएकंद गावचे सुपुत्र असणाऱ्या डॉ. गुरव यांना जिवे मारण्याच्या धमकीची घटना कवठेएकंद येथील ग्रामस्थांना समजल्यानंतर गावातील सर्व नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शेतकरी कामगार पक्ष, आकाशतारा मित्र मंडळाच्यावतीने गावात निषेधाचे फलक लावण्यात आले आहेत. (वार्ताहर)बोलवता धनी कोण? : तपासाचा दृष्टिकोन चुकीचा : बाबूराव गुरव मला धमकी देणाऱ्याने यापूर्वी संभाजी ब्रिगेडची सभा उधळून लावली होती. डॉ. भारत पाटणकर यांची सभा उधळण्याचा प्रयत्न केला होता. आता मला खुनाची धमकी दिली आहे. त्याची कबुलीही दिली आहे. चळवळीतील कार्यकर्त्यांच्या खुनाची मालिकाच सुरू आहे. त्यामुळे ही घटना गांभीर्याने घ्यायला हवी. धमकी देणाऱ्याच्या पाठीमागे कोणी मास्टरमार्इंड आहे का, याचा तपास व्हायला हवा, असे मत डॉ. बाबूराव गुरव यांनी व्यक्त केले. डॉ. गुरव म्हणाले की, २९ जुलैपासून अविनाश थोरवत सातत्याने त्रास देत होता. माझा खून करण्याची धमकी माझ्या मुलाकडे देता होता. मी तासगावात आल्यानंतर, चळवळीतील कार्यकर्त्यांनी या घटनेची माहिती दिली. पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने त्याची कबुलीही दिली. त्याच्याकडे मटक्याच्या चिठ्ठ्या आढळून आल्या होत्या. त्याने रिव्हॉल्व्हर वापरत असल्याचीही कबुली दिली होती; मात्र तपासात याचा कोठेच उल्लेख दिसून येत नाही. पोलिसांकडून केवळ धमकी दिली, एवढ्यावरच तपासाला दिशा दिली जात आहे. मात्र धमकी देणाऱ्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्याने काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मदतीने संभाजी ब्रिगेडची सभा उधळून लावली होती. भारत पाटणकर यांचीही सभा उधळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याची पार्श्वभूमी, धमकी देण्यामागे नेमका बोलवता धनी कोण आहे, याचा तपास होणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातूनही तपासाची दिशा असायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करत, चळवळीतील तीन नेत्यांचे खून झाले आहेत, त्यांच्या पंक्तीत माझा क्रमांक लागण्याइतका मी मोठा नाही, मात्र वेळीच तपास करण्याची आवश्यकता असल्याचे मतही डॉ. गुरव यांनी व्यक्त केले.डॉ. गुरव यांना खुनाची धमकी मिळाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाल्यानंतर मी स्वत डॉ. गुरव यांच्या घरी भेट दिली. धमकी देणाऱ्या संशयितावर प्रतिबंधात्मक कारवाईचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तासगाव ठाण्यात रोज हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्याच्या कारवाईबाबत गुन्हे अन्वेषण शाखेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच साध्या गणवेशातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तही डॉ. गुरव यांना देण्यात आला आहे.- कृष्णात पिंगळे, पोलिस उपअधीक्षक, तासगाव