शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?, महापालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱ्यांचे हाल

By अशोक डोंबाळे | Published: May 18, 2024 6:21 PM

पाच राज्यांतून शेतमालाची आवक, रस्त्याची दयनीय स्थिती

सांगली : सांगली मार्केड यार्डातील रस्ता पावसाळ्यापूर्वीच खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी रस्त्याची दयनीय स्थिती झाली आहे. खड्ड्यांचे अडथळे पार करताना वाहन चालकांची दैना होत असून, त्यात वाहतूक कोंडीची भर पडत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने खडी बाहेर आल्याने दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार वाढले आहेत. दरम्यान, रस्ता दुरुस्ती महापालिका आणि बाजार समितीच्या वादात थांबल्याची माहिती पुढे आली आहे.सांगली मार्केट यार्डातील मुख्य रस्ते, पेठांमधील अंतर्गत रस्ते, असे कोणतेही रस्ते यास अपवाद राहिलेले नाहीत. खड्ड्यांमुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचत आहे. सांगली मार्केट यार्डाच्या दोन्ही प्रवेशद्वारांतच शेतकरी, व्यापाऱ्यांचे खड्ड्यांनी स्वागत होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, ते भरण्याचीही महापालिका आणि सांगली बाजार समिती तसदी घेत नाही. व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार करूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. बाजार समिती प्रशासनाच्या माहितीनुसार सांगली मार्केट यार्डातून जाणारा मुख्य रस्ता महापालिकेकडे आहे. त्यामुळे तो रस्ता महापालिका प्रशासनाने दुरुस्त करून देण्याची गरज आहे; पण यासाठी महापालिकेकडे पाठपुरावाही होत नाही. यामुळे गेल्या वर्षभरापासून सांगली मार्केट यार्डातील मुख्य रस्त्यावरील खड्डे तसेच आहेत. मुख्य रस्त्याबरोबरच पेठेतील रस्त्यांवरही खड्डेच खड्डे आहेत. या रस्त्यांनाही दहा वर्षांत डांबर मिळाले नाही. एवढेच काय, तर सांगली बाजार समितीच्या मुख्य इमारतीसमोरील रस्त्यावरही खड्डेच आहेत. याकडे सांगली बाजार समिती प्रशासनाने दुर्लक्ष का केले आहे, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

रस्ते करणार; पण पावसाळ्यानंतर : महेश चव्हाणसांगली मार्केट यार्डातील मुख्य रस्ता महापालिकेच्या ताब्यात आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी महापालिका प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला आहे. सांगली मार्केट यार्डातील अंतर्गत रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार केले आहे; पण पावसाळा संपल्याशिवाय रस्त्याचे काम करता येणार नाही, म्हणून पावसाळ्यानंतर लगेच रस्त्याचे काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली.

पाच राज्यांतून शेतमालाची आवकसांगली मार्केट यार्डात आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात या पाच राज्यांतून मालाच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार दररोज होत आहेत. शेकडो अवजड वाहने रोज येतात आणि जातात. या वाहन चालकांकडूनही रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तरीही बाजार समिती प्रशासनाला जाग येत नाही.

टॅग्स :SangliसांगलीMarket Yardमार्केट यार्डroad transportरस्ते वाहतूक