वाळवा : थोर समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्था, जनरल बाॅडी सदस्य व हुतात्मा साखर कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.
वाळवा येथील हुतात्मा किसन अहिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्याध्यापक एस.एस. खणदाळे, सांस्कृतिक विभागप्रमुख आर. एन. मुल्ला उपस्थित होते. वैभव नायकवडी यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नायकवडी म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील व क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच रयत शिक्षण संस्थेचे वाळवा येथील किसान शिक्षण संस्थेला सहकार्य लाभले.