साई सम्राट इन्स्टिट्यूट व विविध उद्योगांच्या वतीने महायोद्धा बाजीप्रभू देशपांडे यांना पुण्य दिनानिमित्त अभिवादन करताना धैर्यशील पाटील, राजू काशीद, साईजीत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर्ले : वीर बाजीप्रभू देशपांडे महाप्रतापी, महायोद्धा होते. त्यांनी हिंदवी स्वराज्याचा इतिहास रचला. अशा महायोद्ध्याकडून त्यांचे चरित्र, चारित्र्य आत्मसात केल्यास भारतीय तरुणांचे भवितव्य उज्ज्वल होईल, असे मत साई सम्राट इन्स्टिट्यूट, साई सम्राट अर्बन, सुपर्ब चहा व विविध उद्योगांचे मार्गदर्शक, विश्वस्त धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केले.
साई सम्राट इन्स्टिट्यूट व विविध उद्योगांच्या वतीने महायोद्धा बाजीप्रभू देशपांडे यांना पुण्य दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची पन्हाळा गडावरून सुटका करताना घोडखिंडमध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, वीर शिवा काशीद यांना १८ तासांच्या अविरत लढाईमध्ये वीर मरण प्राप्त झाले. त्यांच्या बलिदानामुळेच हिंदवी स्वराज्याचा पाया रचला गेला. राजू काशीद यांनी प्रास्ताविक तर ऋषिकेश केडगे यांनी आभार मानले.