सांगली : पारे (ता. खानापूर) येथील राजवर्धन पाटील मुलांचे बालगृहातील बोगस पटसंख्येचा अहवाल शासनाला सादर करु नये, यासाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा गोरख पवार यांना दोन लाखाची लाच दिल्याप्रकरणी अटकेत असलेला बालगृहाचा संस्थापक अध्यक्ष अजित उद्धव सूर्यवंशी (वय ४१, रा. कन्याशाळा रस्ता, पलूस) यास न्यायालयाने १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
राजवर्धन पाटील मुलांचे बालगृहात रेकॉर्डवर ८८ मुलांची नोंद आहे. जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी बालगृहास अचानक भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी केवळ सात मुले आढळून आली. सुवर्णा पवार या यासंदर्भातील अहवाल तयार करुन तो वरिष्ठ अधिकाºयांना सादर करीत असल्याची माहिती सूर्यवंशीला मिळाली. त्यामुळे सूर्यवंशी याने पवार यांना लाच देण्याचे आमिष दाखविले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयात पवार यांना एक लाख ९८ हजाराची लाच देताना सूर्यवंशीला रंगेहात पकडण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जोरदार युक्तिवादलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटकेतील सूर्यवंशीला शुक्रवारी दुपारी जिल्हा न्यायालयात उभे केले होते. जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी युक्तिवाद केला. बालगृहात केवळ आठ मुले असताना सूर्यवंशीने कागदोपत्री ८८ मुले दाखवून शासनाचे अनुदान हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा महिला बाल विकास अधिकाºयांनी दिलेल्या भेटीवेळी ८८ मुले आढळून आलीच नाहीत. तसेच सूर्यवंशीच्याआणखी काही संस्था आहेत, तिथेही असाच गोलमाल केला आहे का, याची चौकशी करायची आहे. लाच देण्यासाठी त्याने एक लाख ९८ हजाराची रोकड कोठून आणली, याचाही तपास करायचा आहे, यासाठी पोलीस कोठडी द्यावी, असे अॅड. चिप्रे यांनी युक्तिवादात सांगितले.