शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार अनिल बाबरांनी शिवसेना सोडण्याचे सांगितले कारण, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 2:26 PM

भाजप सोबत जाण्याचंही सांगितलं कारण

दिलीप मोहिते विटा (सांगली) : मी ज्या पक्षात होतो, त्या पक्षाचे प्रमुख आम्हाला कधी भेटतच नव्हते. त्यामुळे पक्षनेतृत्वाबाबत मोठी नाराजी होती. आजकालची राजकीय परिस्थिती पहाता कुठल्याही एका राजकीय पक्षात राहण्याचे दिवस राहिलेले नाहीत, असे विधान खानापूर विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार अनिल बाबर यांनी केले.गार्डी (ता.खानापूर) येथील नवोदित साहित्यीक विजय बाबर यांच्या ‘ठेच’ या पुस्तकाचे प्रकाशन आ. बाबर यांच्याहस्ते व साहित्यिक प्रा. व. बा. बोधे आणि ग्रामीण कथाकार बा. ग. केसकर यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी साहित्यीक प्रा. बोधे यांनी यांनी माझ्या राजकारणातील एका मित्राने मला मी कॉँग्रेसमधून आता राष्ट्रवादीत आलो, परंतु, तेथेही काही बरे चाललेले नाही.त्यामुळे मी आता कोणत्या पक्षात जाऊ? असा सल्ला विचारला. त्यावेळी मी त्याला सांगितले की, बाबारे, तुझे सर्व पक्ष आता फिरून झाले असतील तर तू आता तमाशा पार्टीत जा. हाच मुद्दा पकडत आ. बाबर यांनी शिवसेना पक्ष सोडण्याचे कारण सांगितले.बाबर म्हणाले, मी ज्या पक्षात होतो, त्या पक्षाचे प्रमुख आम्हाला कधी भेटतच नव्हते. ते आजारी असल्याचे सांगितले जायचे. पण त्यांचा ३२ वर्षाचा मुलगा धडधाकट होता. त्याला फिरायला काय झाले होते? आता सगळीकडे फिरत आहेत. आता सध्या कोरोनाची परिस्थिती नाही काय? राज्यसभेच्या निवडणूकीला शिवसेनेच्या उमेदवाराला मते कमी पडली. त्यावेळी मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र पाठविले होते.महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी पुरेशी मते असतानाही शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यावेळी मी याबाबत पक्षपातळीवर विचार झाला पाहिजे, अशी लेखी पत्राव्दारे मागणी केली होती. परंतु, त्याची तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भारतीय जनता पार्टीवर आम्हाला विश्वास वाटल्याने आम्ही त्यांच्या सोबत गेलो, असे अनिल बाबर यांनी शिवसेना पक्ष सोडण्याची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बंडोपंत राजोपाध्ये, शरद बाबर, हेमंत बाबर यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा