शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

नाशिकच्या बाळकृष्ण कापसे यांना यंदाचा कर्मयोगी पुरस्कार

By शरद जाधव | Published: January 10, 2024 4:52 PM

१४ ते १८ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

सांगली : पैठणी व्यवसायाला नावलौकिक मिळवून देत अंध, निराधार व्यक्तींसाठी समाजपयोगी काम करणारे, नाशिक येवला पैठणीचे निर्माते बाळकृष्ण नामदेव कापसे यांना यंदाचा कर्मयोगी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रोख एक लाख रुपये, सन्मान चिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी प्रसिद्ध सिनेअभिनेते आदेश बांदेकर कापसे यांची मुलाखत घेणार आहेत. शांतीनिकेतनमधील लोकरंगभूमी येथे रविवार दि. १४ रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्राचार्य पी.बी. पाटील सोशल फोरमचे सचिव बी. आर. थोरात यांनी पत्रकार बैठकीत दिली.

ज्येष्ठ विचारवंत, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या ९२ व्या जयंती निमित्ताने यंदाही १४ ते १८ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कोषाध्यक्ष गौतम पाटील उपस्थित होते.थोरात यांनी सांगितले की, रविवारी सकाळी दहा वाजता माजी विद्यार्थी मेळावा व गुणवंत माजी विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रमही होईल. यावर्षीचा गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार रोपवाटिका उद्योजक विश्वास यशवंत पाटील यांना सन्मानित करण्यात येणार आहे. १२ ते १६ जानेवारी दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.१४ ते १७ जानेवारीअखेर रांगोळी स्पर्धा, विविध कलात्मक वस्तूंचे भव्य कला प्रदर्शन, १५ रोजी एकतारी भजन स्पर्धा, १६रोजी ग्रुप डान्स स्पर्धा, १७ रोजी लावणी तर १८ रोजी लेझीम स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन बी.आर.थोरात आणि कोषाध्यक्ष गौतम पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीNashikनाशिक