मुंबई/सांगली : नागपंचमीला महाराष्ट्रात जिवंत नाग पकडू नयेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. ए. चांदोलकर व न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने आज, मंगळवारी दिला. नागांना ताब्यात ठेवणे, मिरवणूक काढणे, यावरही महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिवंत नाग पकडण्यासह त्याची पूजा करण्यास व मिरवणूक काढण्यास परवानगी मिळावी, अशी याचिका सांगली जिल्ह्यातील शिराळा ग्रामपंचायतीने दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावल्याने नागपंचमीचा सण नागांच्या प्रतिकृतीची पूजा करूनच साजरा करावा लागणार आहे.न्यायालयाच्या या निर्णयाचे प्राणिमित्र संघटनेने स्वागत केले असून, शिराळ्यातील लोकप्रतिनिधींनी मात्र याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. शिराळा येथील नागपंचमी जगप्रसिद्ध आहे. या सणानिमित्त जिवंत नाग पकडून त्यांची घरोघरी पूजा करण्याची परंपरा या गावात आहे. शिवाय त्यांची मिरवणूकही काढण्यात येते. ‘वन्यजीव अधिनियम १९७२’चा हा भंग असल्याचे सांगून, ही परंपरा बंद करण्यात यावी, अशी याचिका सांगलीतील प्राणिमित्र संघटनेचे अजित (पापा) पाटील, डॉ. रवींद्र व्होरा, प्रा. सुरेश गायकवाड, प्रदीप सुतार, नाना खामकर यांनी २००२ मध्ये पहिल्यांदा दाखल केली होती. तेव्हापासून प्रत्येकवर्षी यासंदर्भात बंदी घालण्याचे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात येत होते. यावर्षी नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शिराळा ग्रामपंचायतीनेच जिवंत नाग पकडण्यास परवानगी मिळावी, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. नागपंचमीला नाग पकडण्याची येथे शेकडो वर्षांची परंपरा व संस्कृती असून, गेली दहा वर्षे न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखून शासकीय यंत्रणेच्या देखरेखीखाली नागपंचमी साजरी होत आहे. मात्र, यापुढे संस्कृती व परंपरा टिकविण्यासाठी जिवंत नाग पकडण्यास परवानगी मिळावी, असे याचिकेत म्हटले होते.या याचिकेवर न्यायालयाने प्राणिमित्र संघटनेचे अजित पाटील, डॉ. रवींद्र व्होरा, सुरेश गायकवाड, आदींचे / पान ९ वर
नाग पकडण्यासही बंदी
By admin | Published: July 16, 2014 1:28 AM