शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नेट कनेक्टिव्हिटीअभावी ताकारीत बँक व्यवहार ठप्प

By admin | Published: November 11, 2015 11:00 PM

ग्राहकांचा खोळंबा : भवानीनगर शाखेतील प्रकार

ताकारी : भवानीनगर (ता. वाळवा) येथे दूरसंचार विभागाची ओ.एफ. सी. केबल तुटल्याने ऐन दिवाळी सणाच्या आदल्या दिवशी दूरध्वनी सेवेबरोबरच नेट कनेक्टिव्हिटीअभावी बँकेचे सर्व व्यवहार ठप्प होते. त्यामुळे ग्राहकांना ताटकळत बसावे लागले. अनेकांना बँकेतून पैसे न मिळाल्याने दिवाळीची खरेदी करता आली नाही.दिवाळीनिमित्त पगार झाले, बोनसही खात्यावर जमा झाला. शेतकऱ्यांना ऊस बिले मिळाली. दिवाळी दणक्यात साजरी करायची, हा बेत आखून बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना मात्र नेट कनेक्टिव्हिटीचा फटका बसला. सर्व व्यवहार बंद असल्याने पैसे मिळाले नाहीत.सध्या बहुतांशी बँका आॅनलाईन व्यवहार करीत आहेत. इंटरनेट सेवा, नेट कनेक्टिव्हिटी असल्याशिवाय बँकेत कोणताच व्यवहार होत नाही. यामुळे पैसे काढण्यासाठी बँकेच्या भवानीनगर शाखेत आलेल्या ग्राहकांना दिवसभर ताटकळत बसावे लागले. यामुळे नाराजी व्यक्त होत होती. (वार्ताहर)समस्या नेहमीचीच : पर्यायी व्यवस्थेची गरज..!---'दूरसंचार विभागाची ओ.एफ.सी. केबल मुख्य रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याखालून नेलेली आहे. पूल, रस्त्याच्या कामादरम्यान नेहमी या केबल तुटतात. याचा परिणाम म्हणून दूरध्वनी, नेट बंद होते. त्यामुळे बँकेने नेट कनेक्टिव्हिटीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज आहे.