सांगली : शिक्षक बँकेच्या सभासदांच्या हितासाठी समविचारी संघटनांशी युती करून निवडणूक लढविण्याचा निर्णय शिक्षक संघाच्या सभेत झाला. तालुका अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक सांगलीत मंगळवारी झाली. प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हाध्यक्ष अमोल माने म्हणाले, शिक्षक संघाने शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केल्याने ते पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास आहे. गेली दहा वर्षे संघ बँकेच्या सत्तेपासून दूर आहे. येणाऱ्या काळात तो सत्तेत असावा ही भूमिका सभासदांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत समविचारी संघटनांसोबत निवडणूक लढविणार आहोत. त्याचे सर्वाधिकार धैर्यशील पाटील यांच्याकडे राहतील.
पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष विजयकुमार चव्हाण, सदस्य मधुकर जंगम, जिल्हा नेते जगन्नाथ कोळपे, सरचिटणीस राहुल पाटणे, कार्याध्यक्ष दिलीप खोत, कोषाध्यक्ष मारुती देवडकर, तालुकाध्यक्ष प्रताप गायकवाड, विजय साळुंखे, नंदकुमार कुट्टे, बाळू गायकवाड, यशवंत गोडसे, धनाजी साळुंखे, भीमराव पवार, संजय खरात, सत्यजित यादव, बाबासाहेब वरेकर, महम्मदअली जमादार, सुधीर पाटील, मल्लिकार्जुन माळी, बसाप्पा पुजारी, सचिन खरमाटे, आदी पदाधिकाऱ्यांनीही भूमिका मांडली.
-------------