शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

बाप्पांचे परदेशगमन यावर्षीदेखील नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 12:58 PM

Ganeshotsav Sangli : कोरोना व लॉकडाऊनमुळे बाप्पांचे परदेशगमन यंदाही होणार नाही. सांगलीतून दरवर्षी दीड हजार मूर्ती अमेरीकेसह युरोपीय देशांत जातात, त्यांची निर्यात लॉकडाऊनमुळे झालेली नाही.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे बहुतांश देशांच्या परदेशी वाहतुकीवर निर्बंधप्रदूषण टाळण्यासाठी शाडूच्या मूर्ती

संतोष भिसेसांगली : कोरोना व लॉकडाऊनमुळे बाप्पांचे परदेशगमन यंदाही होणार नाही. सांगलीतून दरवर्षी दीड हजार मूर्ती अमेरीकेसह युरोपीय देशांत जातात, त्यांची निर्यात लॉकडाऊनमुळे झालेली नाही.गेल्यावर्षी मार्चपासूनच लॉकडाऊन सुरु झाल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला होता. यावर्षीही दुसरी लाट कायम असल्याने गणेशोत्सवाच्या जल्लोषावर निर्बंध जाहीर झाले आहेत. हजारो सांगलीकर व्यवसाय-नोकरीच्या निमित्ताने जगभर विखुरले आहेत.

देश सोडला तरी त्यांनी मराठी संस्कृती जपली आहे. गणेशोत्सवासाठी गावाकडूनच मूर्तीची परंपरा वर्षानुवर्षे सांभाळली आहे. सांगलीतून दरवर्षी सुमारे दीड हजार मूर्ती परदेशी जातात. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, चीन, श्रीलंका, आफ्रीकन देशांत पाठवल्या जातात. प्रवासाला लागणारा प्रदीर्घ वेळ पाहता ऑगस्ट-सप्टेंबरच्या उत्सवासाठी मे, जून महिन्यातच बाप्पांचे प्रयाण होते.यंदा लॉकडाऊनमुळे बहुतांश देशांनी परदेशी वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे जलवाहतूक बंद आहे. परिणामी बाप्पांना परदेशी जाता आलेले नाही. मूर्तीकारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परदेशस्थ मराठी जनांनाही गावाकडच्या बाप्पांच्या मूर्तीची आराधना करता येणार नाही. धातूची मूर्ती किंवा प्रतिमेसमोरच गणरायाची वंदना करावी लागेल.उत्सवावरील निर्बंध पाहता स्थानिक भक्तांसाठीही मर्यादीत संख्येने मूर्ती तयार करण्यात येत आहेत. मंडळांच्या मूर्तीदेखील कमी उंचीच्या व कोणतीही सजावट नसलेल्या आहेत.प्रदूषण टाळण्यासाठी शाडूच्या मूर्तीपरदेशात प्रदुषणाचे निर्बंध अत्यंत कडक असल्याने प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती टाळल्या जातात. पूर्णत: शाडूच्या व प्रदूषणविरहीत रंगाने रंगवलेल्या मूर्ती पाठवल्या जातात. विमानाने निर्यात केली जात नाही. ही वाहतूक खर्चिक आहे, शिवाय मूर्तींची हाताळणीही बेजबाबदारपणे होते. परदेशात पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या मोडतोडीची भिती असते, त्यामुळे जलवाहतुकीमार्गे पाठवल्या जातात.

लॉकडाऊनमुळे यंदा गणेशमूर्ती परदेशात पाठवता आलेल्या नाहीत. दरवर्षी मे-जून महिन्यातच जहाजातून निर्यात केली जाते. पण यावर्षी बाप्पा परदेशी जाऊ शकले नाहीत. यामुळे परदेशस्थ मराठीजनांचा विरस झाला आहे.- हरिहर म्हैसकर,मूर्तीकार, सांगली.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवSangliसांगली