विटा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत चव्हाण यांनी त्यांच्या सभापतिपदाच्या कार्यकाळात बाजार समितीच्या विकासासाठी चांगले प्रयत्न केले होते. शेतीमाल विक्री, अडत व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी चव्हाण यांनी योगदान दिले होते.
चव्हाण यांचा सभापतिपदाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सहकारी संस्थांचे उपनिबंधकांकडे दि. ४ फेब्रुवारीला राजीनामा दिला होता. तो राजीनामा मंजूर झाल्यामुळे सभापतिपद रिक्त झाले होते. या रिक्त पदावर बुधवारी सहाय्यक निबंधक युसूफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सभापतिपदासाठी बापूराव शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडीनंतर नूतन सभापती शिंदे यांनी शेतीमालाची विक्री प्रक्रिया पारदर्शक पार पाडण्याबरोबर शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याहस्ते नूतन सभापती शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मावळते सभापती चंद्रकांत चव्हाण, उपसभापती प्रभाकर आलेकरी, आनंदराव पाटील, राजेश कदम, दिलीप किर्दत, फिरोज शेख, विक्रम शिंदे, अनिल शिंदे, राजाभाऊ शिंदे, महेश घोरपडे, अडत व्यापारी अनिल हराळे, रणजीत कदम, सचिव प्रकाश जाधव, युवराज इनामदार, अस्लम तांबोळी, तानाजी केंगार यांच्यासह संचालक, शेतकरी उपस्थित होते.
फोटो : १७०२२०२१-विटा-सभापती निवड
ओळ : विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी बापूराव शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांचा जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिलीप किर्दत, फिरोज शेख, राजाभाऊ माने, राजेश कदम उपस्थित होते.