शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

आयफोनच्या बदल्यात परत दिल्या साबणाच्या वड्या, डिलीव्हरी बॉयची केली फसवणूक; सांगलीतील दोघांवर गुन्हा दाखल

By शरद जाधव | Published: April 08, 2023 5:39 PM

काही दिवसांनी कंपनीकडे पार्सल पोहोचल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला

सांगली : आत्तापर्यंत ऑनलाईनव्दारे वस्तू मागविल्यानंतर वस्तूऐवजी विटा, साबणाच्या वड्या अथवा केवळ मोकळा बॉक्स देवून ग्राहकांची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे ऐकली असतील. मात्र, सांगलीवाडीत एका ग्राहकाने तीन आयफोन मागवून घेत त्यातील दोन आयफोन काढून घेत बॉक्समधून साबणाच्या वड्या देवून डिलीव्हरी बॉयचीच ८७ हजार १३६ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला.याप्रकरणी श्रीकांत क्रांतीकुमार बेलवलकर (वय ३० रा. लक्ष्मीनगर, सांगली) यांनी रेहान अली खान (रा. संभाजीनगर, सांगलीवाडी) आणि एक अनोळखीविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित रेहान खान याने ऑनलाईन शॉपिंग संकेतस्थळावरून एक लाख ३२ हजार रुपये किमतीच्या तीन आयफोनची ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर देण्यासाठी फिर्यादी बेलवलकर पार्सल कंपनीकडे दि. १४ मार्च २०२३ रोजी आले होते. यानंतर हे पार्सल घेऊन बेलवलकर हे संशयित शेख याच्या सांगलीवाडीतील पत्त्यावर गेले.बेलवलकर यांना बोलण्यात गुंतवून रेहान खान आणि त्याच्यासोबत असलेल्या अनोळखी व्यक्तीने तीन पार्सलपैकी दोन पार्सल बेलवलकर यांच्या नजरेआड घेऊन जात त्यातील ८७ हजार १३६ रुपयांचे दोन आयफोन बाजूला काढले आणि त्याबदल्यात त्यात साबणाच्या वड्या भरून ते पार्सल पुन्हा बांधून परत दिले. बेलवलकर यांनी शेख याच्याकडून ते पार्सल परत घेत कंपनीला पाठविले होते.काही दिवसांनी कंपनीकडे पार्सल पोहोचल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर शुक्रवारी बेलवलकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइन