सांगली : येत्या १४ मे रोजी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त होणारे कार्यक्रम, मिरवणूक रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती लिंगायत समाज युवक संघाचे अध्यक्ष ईश्वर जनवाडे यांनी दिली.
जनवाडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोनामुळे संघटनेने सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय एका ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला. बैठकीस डॉ. महादेव कुरणे, नगरसेवक संजय मेंढे, विजयराव धुळूबुळू, गजेंद्र कल्लोळी, गणेश माळी, उमेश हारगे, मनोहर कुरणे, श्रीकांत महाजन, अनिल हारगे, पंकज म्हेत्रे, सचिन केरीपाळे, मिलिंद हारगे, विक्रम पाटील, राजू सन्नके, सुशील कुडचे, शिवानंद हारगे, जयगोंड कोरे, अजिंक्य कत्तीरे, राहुल छाजवाले, सचिन गाडवे, प्रवीण मंडले आदी उपस्थित होते.
प्रत्येकाने आपल्या घरीच महात्मा बसवेश्वर जयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी. सर्व कार्यक्रम रद्द करून महामारीला काळजीपूर्वक सामोरे जाऊन प्रशासनाला सर्व समाजबांधवांनी सहकार्य करावे, त्याचबरोबर दि. १३ व १४ मे रोजी घरावर ध्वज लावावा, असे आवाहनही जनवाडे यांनी केले आहे.