----------
दोन ऑक्सिजन मशीन भेट
सांगली : शहरातील सर्वपक्षीय कृती व कोरोना रुग्ण साहाय्य व समन्वय समितीला जयसिंगपूर येथील दानशूर व्यापारी बांधवाने दोन ऑक्सिजन सिलिंडर दान केली. आता समितीकडे २२ ऑक्सिजन मशीन असून ती सर्व कोविड रुग्णांना मोफत देण्यात आली आहेत.
यावेळी सतीश साखळकर, शिवसेनेचे शंभुराज काटकर, प्रशांत भोसले उपस्थित होते.
-----------
रेल्वेच्या बोगीत कोविड सेंटर सुरू करावे
सांगली : नंदुरबार जिल्ह्यात रेल्वेच्या बोगीत कोवुड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयाने पुढाकार घेऊन रेल्वे आयसोलेशन बोगी मागवून त्यात कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी कोरोना रुग्ण साहाय्य व समन्वय समितीचे सतीश साखळकर यांनी केली.
---------
गावभागात पाणी टंचाई
सांगली : गावभाग परिसरात महापालिकेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी आयुक्त व महापौरांकडे केली आहे.