अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : प्रदीर्घ काळ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघात गत निवडणुकीत भाजपने बाजी मारत हा किल्ला ताब्यात घेतला होता. या पराभवास मोदी लाटेचे कारण पुढे करीत काँग्रेसने यंदा पुन्हा हा गड ताब्यात घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे हा बालेकिल्ला नेमका कोणाचा, ही ठरविणारी ही निवडणूक असून युती व आघाडीच्या अस्तित्वाची ही लढाई ठरणार आहे.सांगली लोकसभा मतदारसंघात २00९ पर्यंत झालेल्या निवडणुकांत एकवेळचा अपवाद वगळता काँग्रेस कधीही पराभूत झालेली नव्हती. २0१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा विक्रमी मतांनी पराभव करीत भाजपचे संजयकाका पाटील निवडून आले होते. काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळल्याने भाजपच्या नेत्यांचे बळ वाढले. गेल्या पाच वर्षात भाजपने येथील दबदबा कायम ठेवला, मात्र काँग्रेसनेही विरोधी पक्ष म्हणून अस्तित्वाची लढाई सुरू ठेवली. २0१४ मधील भाजपला मिळालेले यश हे मोदी लाटेमुळे मिळाल्याचा प्रचार काँग्रेसने सुरू ठेवला. त्यामुळे काँग्रेसने हा बालेकिल्ला पुन्हा बळकावण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी ताकद पणाला लावली आहे. त्यांना आता राष्टÑवादीचेही बळ मिळाले आहे.गत निवडणुकीत भाजपला राष्टÑवादीनेही छुपी साथ दिल्याची चर्चा होती. यंदा राष्टÑवादीची राज्यभराची धुरा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या खांद्यावर आली आहे. महापालिका निवडणुकीत त्यांच्या पदरी अपयश आल्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांच्या बळाची पुन्हा परीक्षा होणार आहे. त्यामुळे राष्टÑवादी या निवडणुकीत प्रामाणिकपणे आघाडीचा धर्म पाळण्याच्या मानसिकतेत दिसत आहे. काँग्रेसने ताकद एकवटली असली तरी, सक्षम उमेदवाराची चिंता त्यांना अजूनही सतावत आहे. प्रतीक पाटील यांच्या जिल्ह्यातील संपर्कावरून पक्षांतर्गत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेसुद्धा इच्छुक म्हणून पुढे आले आहेत. तरीही या दोघांव्यतिरिक्ति आ. विश्वजित कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या पर्यायाची चाचपणीही पक्षाने केली आहे. तरीही त्यांना अद्याप उमेदवारीचा घोळ मिटविता आलेला नाही. भाजपकडे अनेक सक्षम पर्याय असले तरी, विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. भाजपने या मतदारसंघासाठी पूर्वतयारी केली आहे. या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत विधानसभेचे जे सहा मतदारसंघ समाविष्ट आहेत, त्यातील तीन जागा भाजपकडे, एक शिवसेनेकडे व अन्य दोन काँग्रेस, राष्टÑवादीकडे आहेत. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात युतीचे पारडे जड आहे.भाजपला चिंता : पक्षांतर्गत गटबाजीचीगेल्या पाच वर्षांत अनेक घडामोडींमुळे युतीच्या ताकदीबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते अजितराव घोरपडे हे सध्या नाराज आहेत. मिरज मतदारसंघात भाजपअंतर्गत गटबाजी उफाळली आहे. जत व खानापूर-आटपाडी मतदारसंघातही भाजपमध्ये उघडपणे गटबाजी दिसून येत आहे. त्यामुळे भाजपला २०१४ च्या तुलनेत यंदा अधिक संघर्ष करावा लागणार आहे. भाजपअंतर्गत गटबाजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न कॉँग्रेस व राष्टÑवादीकडून सुरू आहे. त्याला यश मिळाले तर, भाजपच्या अडचणीत वाढ होऊ शकते.सांगलीचे आजवरचे खासदारवर्ष खासदार पक्ष मते१९५२ व्यंकटराव पिराजीराव पवार काँग्रेस १,३३,९१५१९५७ बाळासाहेब ऊर्फ बळवंतराव पाटील शेकाप १,३0,८५४१९६२ राजे विजयसिंह रामराव डफळे काँग्रेस २,१३,६५९१९६७ सदाशिव दाजी ऊर्फ एस. डी. पाटील काँग्रेस २,0४,१८५१९७१ गणपती ऊर्फ अण्णासाहेब गोटखिंडे काँग्रेस २,५३,१२२१९७७ गणपती ऊर्फ अण्णासाहेब गोटखिंडे काँग्रेस १,९२,१२५१९८0 वसंतदादा पाटील काँग्रेस २,९६,१८९१९८३ शालिनीताई पाटील (पोटनिवडणूक) काँग्रेस २,१२,३४३१९८४ प्रकाशबापू वसंतदादा पाटील काँग्रेस ३,0४,२0२१९८९ प्रकाशबापू वसंतदादा पाटील काँग्रेस ३,६१,७५३१९९१ प्रकाशबापू वसंतदादा पाटील काँग्रेस ३,१३,९0६१९९६ मदन विश्वनाथ पाटील काँग्रेस ३,00,३२३१९९८ मदन विश्वनाथ पाटील काँग्रेस ३,३८,९00१९९९ प्रकाशबापू वसंतदादा पाटील काँग्रेस ३,८१,१६२२00४ प्रकाशबापू वसंतदादा पाटील काँग्रेस ३,0५,0४८२00६ प्रतीक पाटील (पोटनिवडणूक) काँग्रेस २,५२,७३२२00९ प्रतीक प्रकाशबापू पाटील काँग्रेस ३,७८,३७0२0१४ संजयकाका पाटील भाजप ६,११,५६३
कॉँग्रेस, भाजपमध्ये अस्तित्वाची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:19 PM