सांगली : जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समिती सभेस दहापैकी नऊ गटविकास अधिकाऱ्यांनी गुरुवारी दांडी मारली. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची जोरदार मागणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मनरेगातील विहिरी, गोठा तसेच शौचालय अनुदान वाटपासाठी वसूल करण्यात येणाऱ्या टक्केवारीला उत्तर द्यावे लागू नये, म्हणूनच अधिकारी गैरहजर राहिल्याचा आरोप सदस्यांनी सभेत केला.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा जि. प. अध्यक्षा तथा समिती सभापती रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या समिती सभेस बांधकाम व आरोग्य समिती सभापती गजानन कोठावळे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मनीषा पाटील, बाबासाहेब मुळीक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील उपस्थित होते.सभेस विट्याचे गटविकास अधिकारी संतोष जोशी वगळता अन्य नऊ अधिकाऱ्यांनी दांडी मारली होती. सर्वसाधारण सभेपासून मनरेगाअंतर्गत विहिरी, गोठा बांधकाम तसेच शौचालयांचे अनुदान घोटाळ्यावर सदस्यांनी हल्लाबोल केला होता. पंचायत समिती पातळीवरच हे प्रकार अधिक होत असल्याच्या तक्रारी आहेत. हे विषय या जलव्यवस्थापन समितीत चर्चेला येणार व अधिकाऱ्यांना उत्तरे द्यावी लागणार यामुळेच ते गैरहजर राहिल्याचा आरोप सदस्यांनी केला. या सदस्यांनी सतीश लोखंडे यांच्याकडे दूरध्वनीवरून तक्रार केली. त्याची दखल घेत लोखंडे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अध्यक्षांच्या परवानगीशिवाय गैरहजर असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.जत तालुक्यातील ४२ गावांना म्हैसाळ पाणी योजनेतून पाणी मिळण्याबाबतचा ठराव करण्यात आला. हा ठराव शासनाकडे पाठवण्यात येणार असून त्याबाबत पाठपुुरावा करण्यात येणार आहे. काल झालेल्या जलव्यवस्थापन समिती सभेत जिल्ह्यातील चार नव्या नळपाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. यामध्ये मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथील ६ कोटी ५ लाख रुपयांच्या पाणी योजनेसह अंकली १ कोटी ९८ लाख, लिंगनूर २ कोटी ५३ लाख, तर पारे येथील १ कोटी ९९ लाख रुपयांची पाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. येथील कामे तातडीने सुरु करण्याच्या सूचना दिल्या. (प्रतिनिधी)७४ गावांमध्ये दूषित पाणीजिल्हा परिषद उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्या गावातील दोन ठिकाणांसह जिल्ह्यातील १२८ पाणी नमुने दूषित आढळले असून, ७४ गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा अहवाल जिल्हा परिषद आरोग्य विभागास प्राप्त झाला आहे. गेल्या महिन्यापासून या गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. दूष्ाित पाणी आढळलेल्या गावांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे- कवठेमहाकांळ- चार, जत- चौदा, इस्लामपूर- सव्वीस, आटपाडी- नऊ, कडेगाव- आठ, खानापूर- एक, मिरज- आठ, तासगाव- आठ.
जलव्यवस्थापन सभेत बीडीओंची दांडी
By admin | Published: June 18, 2015 11:57 PM