शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

हरीपूर व ब्रम्हनाळ येथील पूरग्रस्त भागात मदत साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 11:52 AM

महापूराच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजना मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत. या काळात कोणतीही रोगराई, साथीचे आजार पसरु नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेत तत्पर रहा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

ठळक मुद्देसाथ रोग प्रतिबंधासाठी तत्पर रहा : एकनाथ शिंदेहरीपूर व ब्रम्हनाळ येथील पूरग्रस्त भागात मदत साहित्याचे वाटप

सांगली : महापूराच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजना मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत. या काळात कोणतीही रोगराई, साथीचे आजार पसरु नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेत तत्पर रहा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.हरीपूर व ब्रम्हनाळ येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन मदत साहित्याचे वाटप आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे नेते व युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे - पाटील, खासदार राजन विचारे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशिल माने यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी महापुराचा फटका सांगली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला असून ब्रम्हनाळची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. असे सांगून अदित्य ठाकरे म्हणाले, पाणी ओसरले असून आता मदत कार्य मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. वीज बील माफी, पीक कर्जमाफी झाली आहे. पंचनामे गतीने सुरु आहेत. पडलेली घरे प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधून देण्यात येतील. तोपर्यंत ग्रामीण भागासाठी 24 हजार व शहरी भागासाठी 36 हजार वार्षीक भाडे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गावोगावी आरोग्य शिबिरे सुरु असून त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. असे आवाहन अदित्य ठाकरे यांनी केले. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेSangliसांगली