सुनील वाघमारे ( वय २८, रा. न्यू इंग्लिश स्कूलमागे, मिरज), अनिल हिंदुराव गुजले (वय २६) व अनिल रामचंद्र चंदनशिवे (३८) अशी आरोपींची नावे आहेत. मनोज साठे हे सुनील वाघमारे याच्याकडे मजुरी करीत होते. सुनील वाघमारे याच्याकडे मजुरीची बाकी असलेली रक्कम साठे यांनी त्याच्याकडे मागितली. मजुरी मागितल्याने वाघमारेस राग आला. वाघमारे याने पैसे देण्याच्या बहाण्याने साठे यास गणेश तलावाजवळ बोलावून घेऊन मारहाण केली. सोमवारी (दि. ११) रात्री ९ वाजता साठे हे किराणा दुकानात जात असताना वाघमारेसह अन्य तिघांनी साठे यास जबरदस्तीने मोटारीत बसवून पंढरपूर रस्त्यावर निर्जनस्थळी नेले. तेथे वाघमारे याने साठे यांस जबरदस्तीने मद्य पाजवून सुभाषनगर रस्त्यावर एका खोलीत नेले. तेथे त्यांना लाथाबुक्क्यांनी व सळईने मारहाण करुन दीड हजार रुपये किमतीचा मोबाईल व पाचशे रुपये रोख रक्कम काढून घेतली. पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या पथकाने तिघांना अटक केली.
मजुरीचे पैसे मागितल्याने मजुरास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:30 AM