शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

विट्याच्या ‘बळवंत’चा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने गौरव, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

By हणमंत पाटील | Published: February 29, 2024 6:45 PM

दिलीप मोहिते  विटा : नवमतदार नोंदणी विशेष मोहीम प्रभावीपणे राबवून विक्रमी संख्येने नवमतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल रयत शिक्षण ...

दिलीप मोहिते विटा : नवमतदार नोंदणी विशेष मोहीम प्रभावीपणे राबवून विक्रमी संख्येने नवमतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या विटा येथील बळवंत कॉलेजला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते व सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार बुधवारी प्रदान करण्यात आला.

विटा येथे तहसीलदार उदयसिंह गायकवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बळवंत महाविद्यालयात विशेष नवमतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी विक्रमी संख्येने नवमतदारांची नोंदणी प्रक्रिया पार पडली. तसेच मतदार जागृतीसाठी महाविद्यालयासह विटा शहरात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले होते. या सर्व कामांची दखल घेऊन बळवंत कॉलेजला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात बळवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, नोडल अधिकारी डॉ. प्रवीण बाबर, प्रा. राहुल पाटील, कॅम्पस ॲम्बॅसडर विद्यार्थी सूरज जगदाळे यांनी तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, सहसचिव डॉ. ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी बळवंत महाविद्यालयाचे अभिनंदन केले.

टॅग्स :Sangliसांगलीcollegeमहाविद्यालय