शिराळा : नाटोली (ता. शिराळा) येथील रहिवासी व सोलापूर जिल्ह्यातील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांना उल्लेखनीय कार्याबद्दल यंदाचा बेस्ट कार्यकारी संचालक पुरस्कार पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. यशवंत कुलकर्णी यांनी कारखान्याने राबविलेल्या योजनांमध्ये साखरेची गुणवत्ता राखण्यासाठी जर्मन मेड स्क्रु पंपाचा व मेकॅनिकल सर्क्युलेटर्सचा वापर केला आहे. यामुळे २ टक्के बगॅस बचत व बॉयलरच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ यामुळे वीज निर्मिती व आसवनी प्रकल्पाकरिता अधिकचा बगॅस उपलब्ध झाला आहे. याचबरोब विविध तांत्रिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकणी यांचे चेअरमन आ. प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, व्हा. चेअरमन वसंत देशमुख, संचालक मंडळ, कामगार युनियन यांनी अभिनंदन केले.
फोटो-०९यशवंत कुलकर्णी