शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

Sangli: चिकुर्डेच्या स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार, गाठोड्यात आढळली मुला-मुलींचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:42 AM

ऐतवडे बुद्रुक : चिकुर्डे (ता. वाळवा) येथील स्मशानभूमीत जादूटोणा व भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे. पौर्णिमेच्या रात्री काळ्या रंगाच्या ...

ऐतवडे बुद्रुक : चिकुर्डे (ता. वाळवा) येथील स्मशानभूमीत जादूटोणा व भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे. पौर्णिमेच्या रात्री काळ्या रंगाच्या कपड्यात नारळ, बाहुली, लिंबू, हळद-कुंकू लावून मुलींचे व मुलांचे फोटो आढळले. भानामतीच्या या प्रकारामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने याप्रकरणी तपास करून संशयितांवर जादूटोणाविराेधी कायद्यानुसार कारवाईच्या मागणीचे निवेदन कुरळप पोलिसांना देण्यात आले.

चिकुर्डे ते देवर्डेदरम्यान मुख्य रस्त्यालगत गावची मुख्य स्मशानभूमी आहे. दोन दिवसांपूर्वी पौर्णिमेच्या रात्री येथील स्मशानभूमीच्या लोखंडी रॅकवर पाच ठिकाणी काळ्या कपड्यांमध्ये काहीतरी बांधून ठेवल्याचा ग्रामस्थांना संशय आला. काही ग्रामस्थांनी ही माहिती तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष कृष्णात पवार व पोलिस पाटील सुधीर कांबळे यांना दिली. हे भानामतीचे प्रकरण असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे व विनोद मोहिते यांना माहिती दिली.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी बांधून ठेवलेली गाठोडी सोडली असता त्यामध्ये नारळ, लोखंडी दाभण, बाहुली व मुलींची छायाचित्रे आढळली. या छायाचित्रांवर लोखंडी दाभणाने छिद्र पाडले होते. पाचपैकी एका गाठोड्यात एका मुलाचा व मुलीचा फाेटाे हाेता. हा प्रकार प्रेम प्रकरणातून एखाद्या माथेफिरूने केल्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

स्मशानभूमीतील भानामतीचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारा आहे. मुलांचे तसेच मुलींची छायाचित्रे त्यामध्ये आढळल्याने हे प्रकरण गंभीर आहे. पोलिसांनी तातडीने याप्रकरणी तपास करून प्रकरणाचा छडा लावावा. - कृष्णात पवार, तंटामुक्त ग्राम समिती अध्यक्ष, चिकुर्डे 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कुरळप पोलिसांना संबंधितावर जादूटोणाविराेधी कायद्याअंतर्गत कडक कारवाई करावी याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. - संजय बनसोडे, प्रधान सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

टॅग्स :Sangliसांगली