ओळी : राजारामबापू बँकेच्या सांगली विभागाचे व्यवस्थापक भास्कर कणसे यांचा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्यामराव पाटील, पी. आर. पाटील, जनार्दन पाटील, आर. एस. जाखले, प्रतीक पाटील उपस्थित होते.
लोकमत न्युज नेटवर्क
कामेरी : राजारामबापू बँकेचे सांगली विभागाचे मुख्य व्यवस्थापक भास्कर कणसे
(कामेरी) यांनी आपल्या विभागातील बँकेच्या तीन शाखा ठेवी, कर्ज व वसुली या विभागात प्रथम आणल्याबद्दल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
राजारामबापू बँकेची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच ऑनलाइन घेण्यात आली. त्यावेळी भास्कर कणसे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी बँकेच्या ४६ शाखांमध्ये सांगली विभागातील राजवाडा चौक, मार्केट यार्ड व गावभाग या तीन शाखा ठेवी, कर्ज व वसुली या विभागात अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकांवर आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी बँकेचे कार्यकारी संचालक आर. एस. जाखले, बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक आर. ए. पाटील, सरव्यवस्थापक पी. एन. बाबर, राम दराडे, वसुली विभागाचे प्रमुख एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे यश मिळविले.
यावेळी बँकेचे अध्यक्ष श्यामराव पाटील, उपाध्यक्ष जनार्दन पाटील, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, कार्यकारी संचालक आर. एस. जाखले, युवा नेते प्रतीक पाटील उपस्थित होते.