आमदार अरुण लाड म्हणाले की, संस्थेने सभासदांचे हित जोपासून १०.५ टक्के लाभांश देऊन प्रत्येक वर्षी सभासदांना गृहपयोगी भेट वस्तू दिल्या आहेत. यातून सभासदांचे हिताची जोपासना करून सहकार चळवळ अडचणीत असताना विद्यमान संचालक मंडळाने पारदर्शक कारभार करून स्वतःच्या जागेत नूतन इमारत उभी करीत आहेत.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, जिल्हा परिषदेचे सदस्य शरद लाड, राजेंद्र लाड, कारखान्याचे संचालक संदीप पवार, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, सचिव आप्पासाहेब कोरे, वसंत लाड, स्थापत्य अभियंता महादेव माने, लेबर ऑफिसर वीरेंद्र देशमुख, कॉन्ट्रॅक्टर आप्पासाहेब तारे, संस्थेचे अध्यक्ष मनोहर लाड, उपाध्यक्ष के. के. माने, संस्थापक विश्वास लाड, विजय लाड, संतोष साळुंखे, अनिल जाधव, सुजित पाटील, अजित घाडगे, नागनाथ पाटील, राहुल जाधव, भीमराव माने, सर्जेराव पवार, सचिन पाटील, दीपक धुमाळ उपस्थित होते.