गजानन पाटील ।संख : कृषी विभागाचे दुर्लक्ष, ढगाळ हवामान, वातावरणातील बदल, तुरळक पाऊस, कडक ऊन, माहितीचा अभाव यामुळे जत तालुक्यातील डाळिंब बागांवर बिब्ब्या रोगाचा सुमारे तीन हजार एकर क्षेत्रावर प्रादुर्भाव झाला आहे. या रोगाने शेतकऱ्यांच्या संपूर्ण बागाच गेल्या आहेत. कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. अगोदरच दुष्काळाने हैराण झालेल्या बागायतदारांवर बिब्ब्या रोगाचे नैसर्गिक संकट आल्याने बागायतदार देशोधडीला लागला आहे. शेतकºयांनी फळे तोडून टाकली आहेत.
दरवर्षी फुलोºयात असणाºया व सुपारीच्या आकाराच्या फळांवर बिब्ब्याचे आक्रमण होत होते. मात्र यावर्षी मोठ्या फळांवरही बिब्ब्याने आक्रमण केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. बॅँका, विकास सोसायट्या, सावकारांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार, हा प्रश्न गावा-गावातून उभा आहे. यामुळे गावातील विकास सोसायट्या अडचणीत आल्या आहेत.
कायम दुष्काळी जत तालुक्यामध्ये डाळिंबाच्या मोठ्या प्रमाणात बागा आहेत. शेतकºयांनी १०० टक्के फळबागा अनुदान योजना, एमआरजीसी, ठिंबक सिंचनाच्या साहाय्याने उजाड माळरानावर फुलविल्या आहेत. खडकाळ जमीन, अनुकूल हवामान, कमी पाणी, कमी खर्च, कमी कष्टामध्ये बागा येत असल्याने शेतकºयांनी द्राक्षबागा काढून डाळिंबाची लागण केली आहे. गणेश, भगवा केशर या जातीच्या बागा आहेत. तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र १३ हजार ३४४.५९ हेक्टर इतके आहे. दरीबडची, काशिलिंगवाडी, शेगाव, जाडरबोबलाद, सोन्याळ, जालिहाळ खुर्द, वाळेखिंडी, बेवनूर, दरीकोणूर या परिसरातील शेतकºयांनी चांगल्या दर्जाच्या डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे.
इतर फळबागांपेक्षा कमी मशागतीच्या खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये उत्पादन येत असल्यामुळे शेतकºयांनी अशा बागा फुलविल्या. बिब्ब्या बॅक्टोरिया या विषाणूपासून हा रोग होतो. बिब्ब्या रोग पाने, फळावर पडतो. गोलाकार पाणीदार डाग पडतो, काही तासातच तो गडद तपकिरी किंवा काळपट होतो. डागाच्या ठिकाणी उंचवटा तयार होऊन फळाला छिंद्र पडते. ही सर्व प्रक्रिया अत्यंत कमी काळात घडते. हा संसर्गजन्य रोग आहे. बिब्ब्या पडलेली कित्येक टन डाळिंबे तोडून खड्ड्यात पुरून त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. सध्या दुपारपर्यंत ऊन, दुपारनंतर ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस, जोराचा वारा, धुके असे वातावरणातील बदल ही सर्व परिस्थिती बिब्ब्या रोगाला पोषक होत आहे. यावर्षी पेरूचा आकार असलेल्या, परिपक्व बागांवरही बिब्ब्याने आक्रमण केले आहे.स्ट्रेप्लोसायक्लीनचा घोळमहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व कृषी विद्यालय डिग्रज येथील पथकाने दरीबडची येथील बिब्ब्याग्रस्त बागांना २०१६ मध्ये भेट दिली होती. बिब्ब्या रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्लोसायक्लीन ०.९ टक्के औषधाची फवारणी करावी, असे सांगण्यात आले होते. परंतु तालुक्यातील सेवा केंद्रामध्ये स्ट्रेप्लोसायक्लीन ०.६ टक्के या घटकाचे औषध मिळते. स्ट्रेप्लोसायक्लीन ०.९ टक्के औषध मिळत नाही. सध्या तर स्ट्रेप्लोसायक्लीनऐवजी टेंगमायसीन ९०:१० टक्के हे औषध मिळत आहे. त्यामध्ये स्ट्रेप्लोसायक्लीन सल्फेट + ट्रेटॉसायक्लीन हायड्रोकार्बाईड हे घटक आहेत. परंतु ते बिब्ब्यावर गुणकारी व प्रभावी ठरत नाहीत. शेतकºयांनी बोनेट, बॅक्टेरियानाशक औषधाची फवारणी घेतली आहे, पण ही औषधेही निष्प्रभ ठरलेली आहेत.सोसायट्या अडचणीतशेतकºयांना बागांसाठी दरीबडची, सिद्धनाथ, सोरडी, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर, आसंगी येथील विकास सोसायट्यांनी कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. बागा बिब्ब्या रोगाने वाया गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकºयांकडून कोट्यवधी रुपयांची येणेबाकी असल्याने विकास सोसायट्या अडचणीत आल्या आहेत.
कृषी विभागाचे दुर्लक्ष तालुक्यामध्ये बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव होऊनसुद्धा अद्याप कृषी विभागाने कोणत्याही प्लॉटला भेट दिलेली नाही. शेतकºयांना रोगासंबंधीची, औषधांची योग्य माहिती न झाल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरीबडची येथे सुमारे १५० एकर क्षेत्रावर बिब्ब्याचा प्रादुर्भाव झाला आहे. कृषी आयुक्तांनी डाळिंब बागांचा सर्व्हे करण्याचा आदेश दिला होता. अजूनही सर्व्हेला सुरुवात झालेली नाही. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.या उपायांची गरज...बिब्ब्याग्रस्त फळे तोडून खड्डा काढून पुरावीत किंवा जाळावीत सर्व शेतकºयांनी एकाचवेळी फळधारणा करावीबिब्ब्यावर संशोधन करावे डाळिंबाच्या सामूहिक शेतीचा प्रयोग करावा सेंद्रीय खताचा जास्त प्रमाणात वापर करावाबागायतदार शेतकºयांनी झिरो बजेट शेतीचा प्रयोग करावा. बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव बागांवर मोठ्या प्रमाणात झाल्याने फळे तोडून टाकली आहेत. महागडी औषधे, खतावर मोठा खर्च झाला आहे. शेती तोट्यात आली आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे. - बंडू जेऊर, दरीबडची, डाळिंब बागायतदार