विटा : कडकनाथ कोंबडी व्यवसायात फसवणूक झालेल्या खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्यात दिवसेंदिवस वाढ होत असून, फसवणुकीची तक्रार करण्यासाठी विटा पोलीस ठाण्यात रीघ लागली आहे. शनिवारी पुन्हा १४ शेतकºयांनी सुमारे ३१ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. त्यामुळे तालुक्यातील फसवणूक झालेल्या शेतकºयांची संख्या आतापर्यंत ८३ झाली असून, रक्कम सुमारे १ कोटी ४० लाख रुपयांवर पोहोचली आहे.इस्लामपूरच्या महारयत अॅग्रो कंपनीने कडकनाथ कोंबडी व्यवसायात भरघोस नफ्याचे आमिष दाखवून खानापूर तालुक्यातील शेतकºयांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. अनेकांनी कर्जे काढून या व्यवसायात रक्कम गुंतविली आहे. काहींना पक्षी मिळाले, तर काही पक्षी मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. तोपर्यंतच कंपनीचा बोºया वाजला असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.शुक्रवारअखेर खानापूर तालुक्यातील ६९ शेतकºयांनी १ कोटी ९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार विटा पोलिसांत दिली होती. आज शनिवारी पुन्हा १४ शेतकºयांनी ३१ लाख ३० हजाराला कंपनीने गंडा घातल्याची तक्रार पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्याकडे दिली. त्यामुळे आतापर्यंत तक्रारी दाखल झालेली संख्या ८३ झाली असून, शेतकºयांना १ कोटी ४० लाख रुपयांना महारयत अॅग्रो कंपनीचे फसविल्याचे उघडकीस आले आहे.सूत्रधार सुधीर मोहितेची अटकपूर्व जामिनासाठी धावइस्लामपूर : जगभरात सूत्रधार सुधीर मोहिते याने संभाव्य अटक टाळण्यासाठी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर ९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सुधीर शंकर मोहिते याच्यासह गणेश हौसेराव शेवाळे यानेसुद्धा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज दाखल केला आहे. दोघांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होईल. कडकनाथ कोंबडी पालनातून शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना मालामाल करण्याचे आमिष दाखवत रयत अॅग्रो आणि महारयत अॅग्रो या कंपन्यांच्या माध्यमातून राज्यासह परराज्यातील १० हजारांहून अधिक शेतकºयांना ५०० कोटींपेक्षा जास्त रकमेचा गंडा मोहिते आणि त्याच्या साथीदारांनी घातला आहे. इस्लामपूर पोलीस ठाण्यात या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यापासून सूत्रधार सुधीर मोहिते फरारी झाला आहे. पोलिसांनी शोधमोहीम राबवूनही तो हाताला लागलेला नाही. या घोटाळ्यातील संदीप मोहिते आणि हणमंत जगदाळे हे दोन संचालक सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत.
विट्यामध्ये शेतकऱ्यांची तक्रारीसाठी मोठी रीघ; ‘महारयत’कडून गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 11:49 PM