शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

बिसूरची महिला अपघातात ठार

By admin | Published: January 25, 2016 1:08 AM

मुलगी जखमी : रॉड तुटल्याने ट्रॉलीची धडक

 सांगली : ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये असलेला रॉड तुटल्याने ट्रॉली रस्त्याकडेला थांबलेल्या महिलेला जाऊन धडकल्याने ती जागीच ठार झाली. सुनीता रामदास यादव (वय ३०, रा. बिसूर, ता. मिरज) असे या महिलेचे नाव आहे. बुधगाव नाक्यावर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता हा अपघात झाला. यामध्ये सुनीता यांची मुलगी आरती (अडीच वर्षे) ही गंभीर जखमी झाली आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुनीता यादव या मुलीसोबत बुधगाव येथे आठवडा बाजार असल्याने आल्या होत्या. बाजारात खरेदी केल्यानंतर त्या बिसूरला जाण्यासाठी बुधगाव नाक्यावरील बस थांब्यावर उभा होत्या. त्यावेळी सांगलीकडे ट्रॅक्टर-ट्रॉली (क्र. एमएच १० एस १६०२) निघाली होती. ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये असलेला रॉड अचानक तुटल्याने ट्रॅक्टर पुढे गेला व ट्रॉली सुनीता यादव यांच्या अंगावर जाऊन आदळली. यामध्ये त्या जागीच मरण पावल्या. आरतीला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातग्रस्त ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केली आहे. विच्छेदन तपासणीनंतर सुनीता यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल. (प्रतिनिधी)