सांगली -आदिवासी प्रवर्गातील नगरसेविका स्वाती पारधी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अन्यायाला, जातीयवादी राजकारणाला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा दिला असून एका आदिवासी प्रवर्गातील नगरसेविकेवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ भाजपच्या भटके-विमुक्त जाती मोर्चाच्या वतीने सांगली बस स्थानकासमोरील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने करण्यात आली.
फुले, शाहु, आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणा-या सांगली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आदिवासी समाज व मागासवर्गीय समाजातील कार्यकर्ते व नगरसेवकांवर सातत्याने अन्याय होत आहे. त्यांना जातीयवादी शिवीगाळ, दमदाटी केली जाते.त्यांच्या प्रभागात काही कामावरून वाद आहे,सततच्या वादाला कंटाळून नगरसेवक योगेंद्र थोरात व नगरसेविका स्वाती पारधी यांनी महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.
याबाबत पक्षाच्या नेत्यांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग होत नाही, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करतात व नगरसेवक थोरात यांनीही सातत्याने अन्याय होत असल्याचे सांगितले आहे. भाजपवर जातीयवादी असल्याचा आरोप करणारा राष्ट्रवादी हाच खरा जातीयवादी आहे,त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो असे संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी सांगितले,
यावेळी भटके विमुक्त जाती अध्यक्ष राजू जाधव, अनुसूचित युवा मोर्चा अध्यक्ष अमित भोसले,ओबीसी युवा अध्यक्ष राहुल माने, प्रदेश सदस्य ज्योती कांबळे, भटके विमुक्त जाती महिला अध्यक्ष गीता पवार, सोशल मिडिया अध्यक्ष निलेश निकम,संगीता जाधव, संदीप जाधव, सोहम जोशी, अण्णा वडर, राजू मद्रासी , राहुल शिंदे, सुभाष कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.