Sangli- भाजप, काँग्रेस अन् राष्ट्रवादी सारेच बँक घोटाळ्यात सोबती, कारवाई होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 05:49 PM2023-04-07T17:49:39+5:302023-04-07T17:50:14+5:30

अवसायनातील वसंतदादा शेतकरी बँकेच्या २४७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला

BJP, Congress and NCP are all involved in the Rs 247 crore scam of Vasantdada Shetkari Bank in sangli | Sangli- भाजप, काँग्रेस अन् राष्ट्रवादी सारेच बँक घोटाळ्यात सोबती, कारवाई होणार?

Sangli- भाजप, काँग्रेस अन् राष्ट्रवादी सारेच बँक घोटाळ्यात सोबती, कारवाई होणार?

googlenewsNext

सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी बँकेच्या २४७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांकडून वसुलीची शिफारस केल्याने कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बँकेचे चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्यामार्फत घोटाळ्याची चौकशी करण्यात आली. २७ माजी संचालक व दोन अधिकाऱ्यांच्या १०१ मालमत्तांवर बोजा चढविण्याबाबतचे आदेश यापूर्वी दिले होते. पुणे येथील न्यायाधिकरणाने ते आदेश अंशत: रद्द केले होते. आता चौकशी अधिकाऱ्यांनी उर्वरित कामकाज पूर्ण करून दोन महिन्यांपूर्वी त्यांचा अहवाल सहकार विभागाला सादर केला. यामध्ये त्यांनी संबंधित माजी संचालक व अधिकाऱ्यांवर घोटाळ्यातील रकमांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार वसुलीची शिफारसही करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून ठप्प असलेल्या बॅँकेच्या २४७ कोटींच्या घोटाळा प्रकरणाची चौकशी मे २०२२ पासून पुन्हा गतीने सुरू झाली. आता त्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. घोटाळ्याच्या आरोपपत्रात २७ माजी संचालक, तीन मृत माजी संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर आरोपपत्र दाखल आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुन्हा धावाधाव सुरु आहे.

चौकशीतील रकमांचा असा झाला प्रवास

  • कलम ७२ (२) नुसार झालेल्या चौकशीत २८६ खातेदारांच्या ३६४ कोटी २० लाख ५७ हजार रुपयांच्या कर्ज प्रकरणांवर आक्षेप होते.
  • कलम ७२ (३) मधील चौकशीवेळी पाच वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या ६५ खात्यांची ५७ कोटी ८ लाख ५४ हजारांची कर्ज प्रकरणे वगळली गेली.
  • चौकशीदरम्यान वसुली होऊन ५९ कोटी ३६ लाख ४९ हजार रुपयांची ११४ खाती बंद झाली. ७२ (३) प्रमाणे आता १०७ खात्यांच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण शिल्लक आहे.

Web Title: BJP, Congress and NCP are all involved in the Rs 247 crore scam of Vasantdada Shetkari Bank in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.