शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

Sangli- भाजप, काँग्रेस अन् राष्ट्रवादी सारेच बँक घोटाळ्यात सोबती, कारवाई होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 5:49 PM

अवसायनातील वसंतदादा शेतकरी बँकेच्या २४७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला

सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी बँकेच्या २४७ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांकडून वसुलीची शिफारस केल्याने कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बँकेचे चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्यामार्फत घोटाळ्याची चौकशी करण्यात आली. २७ माजी संचालक व दोन अधिकाऱ्यांच्या १०१ मालमत्तांवर बोजा चढविण्याबाबतचे आदेश यापूर्वी दिले होते. पुणे येथील न्यायाधिकरणाने ते आदेश अंशत: रद्द केले होते. आता चौकशी अधिकाऱ्यांनी उर्वरित कामकाज पूर्ण करून दोन महिन्यांपूर्वी त्यांचा अहवाल सहकार विभागाला सादर केला. यामध्ये त्यांनी संबंधित माजी संचालक व अधिकाऱ्यांवर घोटाळ्यातील रकमांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार वसुलीची शिफारसही करण्यात आली आहे.गेल्या काही वर्षांपासून ठप्प असलेल्या बॅँकेच्या २४७ कोटींच्या घोटाळा प्रकरणाची चौकशी मे २०२२ पासून पुन्हा गतीने सुरू झाली. आता त्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. घोटाळ्याच्या आरोपपत्रात २७ माजी संचालक, तीन मृत माजी संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर आरोपपत्र दाखल आहे. यात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुन्हा धावाधाव सुरु आहे.चौकशीतील रकमांचा असा झाला प्रवास

  • कलम ७२ (२) नुसार झालेल्या चौकशीत २८६ खातेदारांच्या ३६४ कोटी २० लाख ५७ हजार रुपयांच्या कर्ज प्रकरणांवर आक्षेप होते.
  • कलम ७२ (३) मधील चौकशीवेळी पाच वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या ६५ खात्यांची ५७ कोटी ८ लाख ५४ हजारांची कर्ज प्रकरणे वगळली गेली.
  • चौकशीदरम्यान वसुली होऊन ५९ कोटी ३६ लाख ४९ हजार रुपयांची ११४ खाती बंद झाली. ७२ (३) प्रमाणे आता १०७ खात्यांच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहाराचे प्रकरण शिल्लक आहे.
टॅग्स :SangliसांगलीbankबँकBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस