शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

भाजप-काँग्रेसची खडाजंगी--मिरज पंचायत समिती सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:22 AM

मिरज : मिरज पंचायत समिती सभेत शासकीय जमिनीवर अतिक्रमणाबाबत सलगरेत काँग्रेस पदाधिकाºयांवर कारवाई करणारे ग्रामविकासमंत्री आमदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप

ठळक मुद्देजमीनप्रकरणी मंत्र्यांवर पक्षपाताचा आरोपकृषी विभागाने याबाबत शेतकºयांचे प्रबोधन व उपाययोजनांची माहिती देण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरज पंचायत समिती सभेत शासकीय जमिनीवर अतिक्रमणाबाबत सलगरेत काँग्रेस पदाधिकाºयांवर कारवाई करणारे ग्रामविकासमंत्री आमदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत काँग्रेस सदस्यांनी ग्रामविकास मंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी केली. मात्र सभापतींनी ठरावास नकार दिल्याने काँग्रेस व भाजप सदस्यांत शाब्दिक चकमक झाली. आरक्षित जमीन हडप केल्याप्रकरणी आ. खाडे यांच्या संस्थेवर कारवाईची जोरदार मागणी काँग्रेस सदस्यांनी केली.सभापती जनाबाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची सभा पार पडली. सभेत काँग्रेसचे अनिल आमटवणे यांनी मालगाव येथील कुष्ठरोग्यांसाठी आरक्षित असलेली शासकीय जमीन आ. सुरेश खाडे यांच्या शैक्षणिक संस्थेला बेकायदेशीर हस्तांतरित केल्याचा मुद्दा उपस्थित केला. सलगरेत गायरान जमिनीत अतिक्रमणाच्या तक्रारीमुळे काँग्रेसच्या सरपंच व उपसरपंचांना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी अपात्र ठरविण्याची कारवाई केली आहे. मात्र मालगाव येथील कुष्ठरोग्यांसाठी आरक्षित जमीन हडप केल्याबद्दल आ. खाडे यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही.सलगरे व मालगाव येथील प्रकरणाबाबत वेगवेगळा न्याय देणाºया ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी आमटवणे यांनी केली. यावरून आमटवणे व विक्रम पाटील, राहुल सकळे यांच्यात शाब्दिक चकमक झडली.राष्टÑवादीचे अजयसिंह चव्हाण यांनीही शासनाची जागा कवडीमोल किमतीने कब्जा करून सामान्यांची लूट सुरू असल्याची टीका केली. भाजपचे किरण बंडगर यांनी मालगाव येथे राष्टÑवादी नेत्यांनी मालगाव दर्ग्याची जागा बेकायदा विक्री केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.सांगली-आष्टा मार्गावर रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडल्याने अपघातांची संख्या वाढली असल्याने रस्ता दुरूस्तीची मागणी जयश्री डांगे व अजयसिंह चव्हाण यांनी केली. तालुक्यात अनेक गावात दिवाबत्ती नादुरूस्त असून याबाबत पंचायत समिती व महावितरण जबाबदारी टाळत असल्याचे किरण बंडगर यांनी सांगितले.उपसभापती काकासाहेब धामणे यांनी विदर्भात कीटकनाशक फवारणीमुळे शेतकºयांचा बळी गेला असल्याने कृषी विभागाने याबाबत शेतकºयांचे प्रबोधन व उपाययोजनांची माहिती देण्याची सूचना कृषी विभागाच्या अधिकाºयांना केली.वन विभागाने लागवड केलेली रोपे अनेक ठिकाणी वाळून जात असल्याचे अजयसिंह चव्हाण यांनी निदर्शनास आणले. सतीश कोरे, रंगराव जाधव, सुमन भंडारे, शुभांगी सावंत, छाया हत्तीकर, गीतांजली कणसे, पूनम कोळी, त्रिशला खवाटे चर्चेत सहभागी होत्या. गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. सभेत माजी उपसभापती रामदास पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली.काँग्रेस सदस्यांची समजूत काढलीमालगाव येथील जमीन प्रकरणावरून काँग्रेसने आ. खाडे यांना लक्ष्य केले आहे. आजच्या सभेत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे काँग्रेस व भाजपला वेगवेगळा न्याय देत असल्याचा आरोप करीत काँग्रेस सदस्यांनी मुंडे यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी केली. या ठरावास भाजप सदस्यांनी विरोध दर्शविल्याने शाब्दिक चकमक झाली. उपसभापती काकासाहेब धामणे यांनी, असा ठराव करता येत नसल्याची काँग्रेस सदस्यांची समजूत काढत या विषयावर पडदा टाकला.