शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

भाजप, कॉँग्रेस, राष्ट्रवादीत लढत

By admin | Published: October 01, 2014 10:19 PM

जत मतदारसंघ : अकराजण रिंगणात; खांदेपालटानंतर चुरशीचा सामना

जयवंत आदाटे - जत विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात अकरा उमेदवार आहेत. त्यामध्ये सात राजकीय पक्षांचे उमेदवार व चार अपक्षांचा समावेश आहे. या अकरामध्ये एकमेव महिला उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहे. अकरा उमेदवार असले तरी, येथील निवडणूक भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येच होणार आहे.आमदार प्रकाश शेंडगे २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. यावेळी ते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. मागील पाच वर्षात त्यांचा जनसंपर्क कमी होता. त्यामुळे भाजपमध्येच त्यांच्याबद्दल नाराजी होती. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यावेळी त्यांचे समर्थन केलेले कार्यकर्ते आता त्यांच्याविरोधात आहेत. या विरोधकांना थोपवून राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणूक प्रचार यंत्रणा राबविताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. धनगर समाज आणि मागासवर्गीय समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी आमदार शेंडगे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये त्यांना कितपत यश येईल, हे १९ रोजीच स्पष्ट होईल.मागील निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढणारे विलासराव जगताप यावेळी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश शेंडगे यांना डावलून पक्षाची उमेदवारी मिळविण्यात जगताप यांनी बाजी मारली आहे. यामुळे त्यांनी आधीच निम्मी बाजी मारली आहे, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. राष्ट्रवादीमध्ये असूनही लोकसभा निवडणुकीत भाजपच्या संजयकाका पाटील यांना जगताप यांनी मदत केली होती. त्यामुळे आता त्यांच्या पाठीशी खासदार पाटील संपूर्ण ताकद लावणार, हे स्पष्ट आहे. एकेकाळी जगताप यांचे समर्थक मानले गेलेले आणि काही कारणांमुळे नाराज होऊन दूर गेलेले प्रभाकर जाधव व प्रकाश जमदाडे यांना आपलेसे करून त्यांनी बेरजेचे राजकारण केले आहे. याचा त्यांना निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.भारती बँकेचे संचालक व माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे नातेवाईक विक्रम सावंत काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. जत मतदारसंघात १४ ते १६ हजार इतका तरुण मतदार आहे. फेसबुक आणि व्हॉटस् अ‍ॅप या सोशल मीडियाचा वापर करून नवतरुण मतदारांना त्यांनी आकर्षित केले आहे. याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षातील वसंतदादा गटाचे प्रमुख सुरेश शिंदे यांनी त्यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली होती. मात्र शिंदे यांचे बंड शमवण्याची जबाबदारी डॉ. कदम यांनी मदन पाटील यांच्यावर टाकली होती. शिंदे यांनी बंड मागे घेतले असले तरी पक्षांतर्गत नाराजांची मर्जी सांभाळून वसंतदादा गटाला शह देताना विक्रम सावंत यांची दमछाक होणार आहे.जत विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात अकरा उमेदवार असले तरी, प्रकाश शेंडगे, विलासराव जगताप आणि विक्रम सावंत हे तिघेच तुल्यबळ उमेदवार आहेत. त्यामुळे येथील निवडणूक तिरंगी होणार आहे. प्रचारयंत्रणा यशस्वीपणे राबवून मतदारांना भेटून त्यांचे रूपांतर मतदानात करून घेण्यात जो उमेदवार यशस्वी होईल, त्याला यश मिळण्याची शक्यता आहे. ऐनवेळी केलेले पक्षांतर, तालुका विभाजन, म्हैसाळ योजनेचे पाणी, जत येथे होणारे कृषी महाविद्यालय, खराब रस्ते आदी प्रमुख प्रश्न प्रचारातील मुद्दे राहणार आहेत. नावपक्षप्रकाश शेंडगे राष्ट्रवादीविलासराव जगताप भाजपविक्रम सावंत काँग्रेसभाऊसाहेब कोळेकर मनसेसंगाप्पा तेली शिवसेनाजकाप्पा सर्जे बसपाबबन शिंगाडेशेकापदिनकर पतंगे अपक्षरवींद्र सोनार अपक्षसखुबाई खांडेकर अपक्षसुनील दलवाई अपक्ष