शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

आटपाडीत भाजपचा झेंडा

By admin | Published: February 23, 2017 11:07 PM

जत --जगतापांची पकड जतवर कायम

अविनाश बाड --आटपाडी --जिल्हा परिषदेच्या ४ पैकी ४ आणि पंचायत समितीच्या ८ पैकी ६ जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे आटपाडीत भाजपला अच्छे दिन आले आहेत. दिघंची गणात राष्ट्रवादीने घड्याळाची टिकटिक चालू ठेवली आहे. खरसुंडी गणात कॉँग्रेसने विजय मिळविल्याने तालुक्यात राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसने अस्तित्व राखले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, अमरसिंह देशमुख यांनी भाजपत प्रवेश केला. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि देशमुख बंधू एकत्रित लढविलेली ही निवडणूक तालुक्यात भलताच चर्चेचा विषय ठरली होती. आटपाडीत अरुण बालटे २७३१ मताधिक्याने विजयी झाले, तर आटपाडी गणात भाजपचे उमेदवार हर्षवर्धन देशमुख १६७१ मताधिक्याने विजयी झाले. शिवसेना आणि स्वाभिमानी विकास आघाडीची युती येथे झाली होती. याशिवाय राष्ट्रवादीचे उमेदवार सादिक आणि अपक्ष उमेदवार विजय सातारकर हे रिंगणात होते. या निवडणुकीला पाटील विरुद्ध देशमुख आणि पडळकर असेही स्वरूप आले होते. दिघंची गटात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत झाली. त्यात दिघंची पंचायत समिती राष्ट्रवादीला मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीचे हणमंतराव देशमुख यांनी गड राखला. निंबवडे गणातही भाजपचे कमळ फुलले. करगणी गटात भाजप-शिवसेना असा चांगलाच सामना रंगला. पडळकर यांच्या नेतृत्वाखाली येथे वंदना गायकवाड, तर शिवसेनेच्या मनीषा पाटील यांच्यात चुरस झाली. करगणी गटाबरोबरच कौठुळी गणाच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष होते. तिथे भाजपने बाजी मारली. खरसुंडी गटात भाजप पुरस्कृत ब्रह्मदेव पडळकर यांनी कॉँग्रेसचे जयदीप भोसले यांना मात दिली. पण खरसुंडी गणात कॉँग्रेसच्या सारिका भिसे यांच्या गळ्यात विजयश्री पडली. विजयी उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेऊन जल्लोष केला.  

जगतापांची पकड जतवर कायमजयवंत आदाटे --जततालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ पैकी सहा, तर पंचायत समितीच्या अठरापैकी नऊ जागांवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करुन आमदार विलासराव जगताप यांनी तालुक्यावरील पकड कायम ठेवण्यात यश मिळविले. कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष पी. एम. पाटील यांच्या बिळूर जि. प. मतदार संघात त्यांना एकही जागा राखता आली नाही. जनसुराज्य पक्षाचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील यांचा संख मतदार संघ बालेकिल्ला होता. आता तेथे सत्तांतर झाले आहे. शेगाव गटात प्रकाश भोसले यांची एकहाती वीस वर्षे सत्ता होती. तेथेही सत्तांतर होऊन हा मतदार संघ भाजपकडे गेला आहे. मुचंडी गटात रमेश पाटील यांची एकहाती पंधरा वर्षे सत्ता होती. तेथे राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही. संपूर्ण मतदार संघ कॉँग्रेस पक्षाकडे गेला आहे. उमदी गटात अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर व अ‍ॅड. चन्नाप्पा होर्र्तीकर यांची एकहाती पंधरा वर्षे सत्ता होती. तेथे सत्तांतर होऊन संपूर्ण मतदार संघ कॉँग्रेसकडे गेला. डफळापूर गटातही कॉँग्रेसने एकहाती सत्ता हस्तगत केली आहे.राष्ट्रवादी व वसंतदादा विकास आघाडीसाठी माजी आमदार प्रकाश शेंडगे, सुरेश शिंदे, मन्सूर खतीब, रमेश पाटील आदींनी प्रचार केला, परंतु त्यांना यश मिळाले नाही. सुरेश शिंदे यांनी बंडखोरी करुन डफळापूर, शेगाव व बनाळी गटात उमेदवार उभे केले होते. त्यापैकी शेगाव गणातील एक जागा त्यांना मिळाली आहे. तालुक्यात शिवाजी शिंदे हे शेगाव पंचायत स. मतदार संघातून सर्वाधिक कमी (१२०) मतांनी विजयी झाले आहेत, तर सर्वाधिक मतांनी येळवी गणातून मंगल जमदाडे विजयी झाल्या.