शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

भाजपचं मार्केटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:09 AM

श्रीनिवास नागे... अखेर पलूस-कडेगावमधून संग्रामसिंह देशमुखांचा अर्ज मागे घेत भाजपनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना बिनविरोध आमदार होण्याची संधी बहाल केली. वातावरण निर्मितीतून दबाव टाकण्यात आणि सरतेशेवटी पक्षाची प्रतिमा उंचावण्यात भाजप सरस ठरला, तरी कार्यकर्ते-स्थानिक नेत्यांना मात्र वरिष्ठ नेत्यांनी तोंडावर पाडलं, हेही खरं.ही पोटनिवडणूक लागली तेव्हाच, बिनविरोध होणार का, असा ...

श्रीनिवास नागे... अखेर पलूस-कडेगावमधून संग्रामसिंह देशमुखांचा अर्ज मागे घेत भाजपनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना बिनविरोध आमदार होण्याची संधी बहाल केली. वातावरण निर्मितीतून दबाव टाकण्यात आणि सरतेशेवटी पक्षाची प्रतिमा उंचावण्यात भाजप सरस ठरला, तरी कार्यकर्ते-स्थानिक नेत्यांना मात्र वरिष्ठ नेत्यांनी तोंडावर पाडलं, हेही खरं.ही पोटनिवडणूक लागली तेव्हाच, बिनविरोध होणार का, असा सवाल विचारला जात होता. अर्थातच चर्चेच्या केंद्रस्थानी भाजप आणि कदम घराण्याचे कट्टर विरोधक देशमुख होते. कारण कदम-देशमुखांचा दुरंगी सामना १९८५ पासून चालत आलेला. त्यामुळं आता काय होणार, हे विचारलं जाणं, स्वाभाविकच होतं. काँग्रेसनं विश्वजित यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेना आणि राष्टÑवादीनं पाठिंबा जाहीर केला. पण भाजपनं मागच्या बुधवारी पत्ते ‘ओपन’ केले... तेही अर्धवटच. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचं नाव पुढं करण्याची चाल भाजपनं खेळली. खासदार-चार आमदारांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शनानं अर्जही भरला. त्यातून कार्यकर्ते रिचार्ज झाले... तयारीला लागले....पण अर्ज भरल्यानंतर झालेल्या सभेतली नेत्यांची भाषणं भाजपच्या चालीचा अंदाज देऊन जात होती. ‘पक्षानं कोणताही निर्णय घेतला तरी आम्ही त्याच्याशी बांधील आहोत...’ असं प्रत्येकजण सांगत होता, अगदी देशमुखही! तो ‘कोणताही’ निर्णय म्हणजे काय होतं, हे आता समजलं! विशेष म्हणजे अर्ज गुरुवारी भरल्यानंतर रविवारपर्यंत देशमुख गटाची कोणतीच हालचाल दिसत नव्हती. ना सभा, ना बैठका, ना चर्चा! पलूस-कडेगावात नेहमी देशमुखांबोबत असलेले राष्टÑवादीचे अरुण लाडही ‘सोमवारनंतर बघू,’ असं सांगत होते. सोमवारी या नाट्याची अखेर झाली. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील मुख्यमंत्र्यांचा सांगावा घेऊन आलेले. त्यांनी जिल्ह्याच्या कोअर कमिटीसह देशमुखांना निर्णय सांगितला... आणि अर्ज मागे घेण्यात आला. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगावच्या पोटनिवडणुकीत भाजपने आर. आर. आबांच्या पत्नीला पाठिंबा दिला होता. तोही अर्ज भरण्याचं नाटक वगैरे न करता. मग इथं पाठिंबा द्यायचं ठरलंच होतं, तर अर्ज का भरला, आम्हाला तोंडावर का पाडलं, असा सवाल लढाईच्या तयारीत असलेले स्थानिक नेते आणि कार्यकर्ते करणार नाहीत का? पण पक्षाचा उदोउदो आणि मार्केटिंग करण्याचा डाव आखलेल्या वरिष्ठांना ते कसं समजणार?पतंगरावांच्या निधनामुळे विश्वजित यांच्या पाठीशी सहानुभूती राहणार, हे भाजपला पक्कं माहीत होतं. शिवाय पुढील विधानसभा निवडणूक वर्षभरात होतेय. त्यामुळं वर्षभरात दोनदा शक्ती खर्च करण्यापेक्षा पुढच्यावेळीच ताकद लावावी, असं स्पष्ट मत भाजपमधल्या चाणक्यांनी मांडलं होतं. तेव्हाच सगळं ठरलं होतं... पण त्यातूनही संधी साधता येते का, हे पाहिलं गेलं.यादरम्यान पद्धतशीर वातावरण तापवलं गेलं. १९९६ मध्ये तत्कालीन आमदार संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज देशमुख रिंगणात उतरले होते. मात्र त्यावेळी पतंगराव कदम यांनी निवडणूक बिनविरोध केली नव्हती. हा मुद्दा उचलण्यात आला. तो सर्वदूर पसरवण्यात आला. आपण रिंगणात उतरणारच, असा शड्डू ठोकत कार्यकर्ते आणि समर्थकांना चेतवण्यात आलं. मधूनच ‘पालघर आम्हाला सोडा, पलूस-कडेगाव आम्ही सोडतो’, असा न चालणारा अतार्किक पत्ता टाकला गेला. दबावतंत्रात माहीर असलेल्या भाजपनं काँग्रेसला हवेवर ठेवलं. एकीकडं संग्रामसिंहांच्या भविष्यातील वाटचालीसाठी केलेली ही पेरणी होती, तर दुसरीकडं पक्षाचा उदोउदो करण्यासाठी मुद्दाम मिळवण्यात आलेली संधी होती.जाता-जाता : पलूस-कडेगावच्या राजकीय स्थितीचा नेमका अंदाज भाजपला आला. सहानुभूतीच्या लाटेत आपण टिकणार नाही, याची खात्री असल्यानंच इथं माघार घ्यायचं ठरलं. माघारीमुळं राजकीय पक्षांसह शासकीय यंत्रणेचा खर्च, वेळ आणि मेहनत वाचली, असा मेसेज जाईल, पक्षाची प्रतिमाही उंचावेल, असा अंदाज बांधला गेला. विद्यमान आमदार किंवा खासदार दिवंगत झाल्यास आणि त्याच्या घरातला उमेदवार उभा असल्यास तिथं उमेदवार उभा न करण्याची परंपरा भाजपनंच पाळल्याचे नगारे वाजवायला सुरुवात झाली... याच मार्केटिंगसाठी होता सगळा अट्टहास!