जतमध्ये गोपीचंद पडळकर यांचा विजय, काँग्रेसचे विक्रम सावंत यांचा ३७ हजारांनी केला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 06:08 PM2024-11-24T18:08:38+5:302024-11-24T18:09:08+5:30
जत : जत विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांचा ३७ हजार ८८१ ...
जत : जत विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांचा ३७ हजार ८८१ मतांनी दारुण पराभव केला. जतचा निकाल हा धक्कादायक ठरला आहे. विस्तारित म्हैसाळ योजनेस निधी, लाडकी योजना व उमदी येथे एमआयडीसी उभारण्याच्या संकल्पनेने पडळकर यांना जत तालुक्यातून आघाडी मिळाली आहे.
जत मतदारसंघ खुला झाल्यानंतर दुसऱ्यांदा उभारलेल्या उमेदवाराचा पराभव झाला. तीच परंपरा जत तालुक्यात पुन्हा चौथ्यांदा झाली आहे. विक्रम सावंत यांचा दारुण पराभव झाला. पहिल्यांदा जत मतदारसंघ खुला झाल्यानंतर २००९ मध्ये प्रकाश शेंडगे हे १८ दिवसांत आमदार झाले. त्यानंतर २०१४ ला विलासराव जगताप निवडून आले. २०१९ साली विक्रम सावंत निवडून आले. आता मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर तयारी सुरू केलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीन महिन्यांत चांगले वातावरण निर्माण करत बाहेरच्या मतदारसंघातील पडळकर हे निवडून आले.
पहिल्या फेरीत गोपीचंद पडळकर यांना ८२८ मतांनी आघाडी मिळाली ती २१ व्या फेरीअखेर वाढतच गेली. प्रत्येक फेरीत त्यांची मते वाढत गेली. फक्त दहाव्या फेरीत विक्रम सावंत यांना मताधिक्य मिळाले. अखेर गोपीचंद पडळकर यांना ३७ हजार १०३ मतांची आघाडी मिळाली.
अखेर गोपीचंद पडळकर यांना ३७ हजार १०३ मतांनी आघाडी मिळाली. दुसऱ्या फेरीत आघाडी मिळाल्यावरच पडळकर समर्थक व कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. मतमोजणी केंद्राच्या परिसरात सात ते आठ जेसीबी मशीन आणण्यात आल्या. त्याचबरोबर डीजेचा आवाज घुमू लागला. कार्यकर्त्यांचा उत्साह प्रत्येक फेरीअखेर वाढतच होता. १८ व्या फेरीनंतर पडळकर हे तहसील कार्यालयात जात असतानाच कार्यकर्त्यांनी त्याच्यावर गुलालाचा वर्षाव केला.
विजयाची कारणे
- गोपीचंद यांना निवडून दिल्यावर विधान परिषदेवर आणखी एक जत आमदार घेण्याची घोषणा
- लाडकी बहीण योजना पथ्यावर पडली
- धनगर समाजाची मते पथ्यावर
पराभवाची कारणे
- विकासकामांचा निधी मिळाला नाही.
- सावंत यांनी दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय स्वत: घेतले.
- मतदारांशी फटकळ बोलणे हे पराभवाचे मुख्य कारण.