कुपवाड : पश्चिम बंगाल येथे निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ले केले जात असून कार्यालयाची तोडफोड आणि जाळपोळ केली जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ कुपवाड शहर भाजपच्यावतीने बुधवारी जोरदार निदर्शने करण्यात आली.
नगरसेवक प्रकाश ढंग, कुपवाड शहर अध्यक्ष रवींद्र सदामते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक ढंग म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपच्या कार्यालयांवर, भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहेत. यामध्ये काही कार्यकर्त्यांचा बळी गेला आहे. पश्चिम बंगाल सरकारचे हे कृत्य निषेधार्ह असे आहे. त्यांचे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत.
यावेळी सदामते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर केले जाणारे हल्ले ही घटना गंभीर आहे. तृणमूल सरकारचे हे कृत्य अत्यंत चुकीचे असे आहे.
यावेळी कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी नगरसेवक प्रकाश ढंग, कुपवाड शहर अध्यक्ष रवींद्र सदामते, शिवशक्ती पतसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रूपनर, बापूसाहेब हाके, सागर सायमोते, प्रवीण मगदूम, अमर मलमे, प्रकाश पाटील, गणेश पवार आदी उपस्थित होते.
फोटो : ०५ कुपवाड १
ओळ :
कुपवाड भाजपच्यावतीने पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रकाश ढंग, कुपवाड शहर अध्यक्ष रवींद्र सदामते, शिवशक्ती पतसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रूपनर, बापूसाहेब हाके उपस्थित होते.