शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
पुरुष टेलर घेऊ शकणार नाही महिलांचे माप, उत्तर प्रदेश महिला आयोगाचा प्रस्ताव
5
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
6
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
7
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
8
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
9
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
10
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
11
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
12
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
13
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
14
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
15
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
17
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
18
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
19
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना

तृणमूल काँग्रेसचा भाजपकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:27 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या व त्यांच्यावरील हल्ल्यांचा निषेध करीत, भाजपच्या वतीने बुधवारी सांगलीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या व त्यांच्यावरील हल्ल्यांचा निषेध करीत, भाजपच्या वतीने बुधवारी सांगलीत निदर्शने करण्यात आली. हल्लेखोर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.

सांगलीत आ.सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली विश्रामबाग येथील त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ‘टीएमसी सरकार का काम क्रुरता है, पश्चिम बंगाल में भाजप कार्यकर्ता मरता है’ असे फलक हाती घेऊन आंदोलक सहभागी झाले होते. यावेळी आ.गाडगीळ म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. जवळपास ८ ते १० भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे.

केंद्र शासनाने या ठिकाणचे हे हत्याकांड थांबविताना संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली. आंदोलनात युवामोर्चाचे अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, नगरसेवक संजय कुलकर्णी, विश्वजीत पाटील, गणपती साळुंखे, मकरंद म्हामुलकर, शरद नलावडे, अतुल माने, श्रीकांत वाघमोडे, सतीश खंडागळे सहभागी झाले होते.