शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

Sangli: मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांची बंडखोरांशी लढत, आघाडीत बंडखोरीची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 5:55 PM

जयंत पाटील यांच्या गटाची भूमिका काय ?

सदानंद औंधेमिरज : पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात भाजप बंडखोर मोहन वनखंडे यांनी बंडखोरी करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वनखंडे यांना काँग्रेसच्या उमेदवारीच्या भीतीने महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पालकमंत्री खाडे यांची लढत भाजप व महाविकास आघाडीच्या बंडखोरांशी होऊ शकते.लोकसभा निवडणुकीत भाजप मिरजेत २५ हजाराने पिछाडीवर आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये बंडखोरी झाल्याने खाडे यांच्यापुढे विरोधकांचे आव्हान आहे. निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्र्यांच्या विरोधात आघाडी उघडणारे भाजपचे वनखंडे यांना मिरजेत महाविकास आघाडीची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. मिरजेत चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या सुरेश खाडे यांना आव्हान देणाऱ्या वनखंडे यांच्यामुळे मिरजेत भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे.

जयंत पाटील यांच्या गटाची भूमिका काय ?लोकसभा निवडणुकीतील पिछाडी भरून काढण्यासाठी पालकमंत्री खाडे मतदारसंघात ठाण मांडून आहेत. तर शहरात निधीसाठी पालकमंत्र्यांना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांनी घूमजाव केल्याने नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. सांगलीचे खासदार विशाल पाटील व माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने भाजप बंडखोराचा काँग्रेस प्रवेश झाला. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मिरजेतील गट नाराज झाला. हा गट कोणती भूमिका घेणार यावरही निवडणुकीची समीकरणे अवलंबून आहेत.

तिरंगी लढतीची शक्यतामोहन वनखंडे यांच्या महाविकास आघाडीत प्रवेशामुळे उमेदवारी भाजप बंडखोरास मिळाल्यास सामूहिक राजीनामे व बंडखोरीचा इशारा उद्धवसेनेने दिला आहे. तसेच काँग्रेसचे सी. आर. सांगलीकर यांनीही बंडखोरी करून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. जयंत पाटील यांच्या समर्थक गटाचीही नाराजी कायम आहे. त्यामुळे भाजपप्रमाणे महाविकास आघाडीतही बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरजेत तिरंगी लढतीची चर्चा आहे.

२०१९ निवडणूक

  • सुरेश खाडे (भाजपा) ९६,३६९,
  • बाळासाहेब होनमोरे (आघाडी) ६५,९७१,
  • विजयी मताधिक्य ३०,३९८
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४miraj-acमिरजMahayutiमहायुतीBJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024