शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

सांगलीत सभापतिपदावरून भाजपमध्ये संघर्ष : संदीप आवटी यांचे नाव आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:45 PM

बुधवारी सायंकाळी अचानकच मिरजेचे संदीप आवटी यांचे नाव समोर आले. भाजपच्या कोअर कमिटीने आवटी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची कुजबूज भाजप नगरसेवकांत सुरू झाली.

ठळक मुद्देसांगली महापालिका स्थायी समिती ; माळी, मगदूम यांच्या भूमिकेकडे लक्ष

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदावरून भाजपमध्ये संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. गुरुवारी सभापतिपदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, बुधवारी सायंकाळी ऐनवेळी मिरजेचे संदीप आवटी यांचे नाव आघाडीवर आल्याने इच्छुक गणेश माळी व गजानन मगदूम यांची धाकधूक वाढली आहे. आवटी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास या दोघांच्या भूमिकेकडेही लक्ष लागणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी गुरुवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. या तीनही समित्यांवर सत्ताधारी भाजपचे वर्चस्व आहे. यापैकी स्थायी सभापतिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. सभापतीसाठी मिरजेतून गणेश माळी व कुपवाडचे गजानन मगदूम यांची नावे आघाडीवर होती. त्यात पहिला सभापती सांगलीचा झाल्याने यंदा मिरज अथवा कुपवाडला संधी मिळेल, अशी चर्चा होती.

मिरजेतून गणेश माळी यांनी जोरदार फिल्ंिडग लावली होती. सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, महापालिकेतील नेते शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील यांच्यासह प्रमुख नेतेमंडळींची भेट घेऊन सभापतिपदावर दावा केला होता. त्यांना संधी मिळेल, अशीच चर्चा सुरू होती. त्यात कुपवाडचे गजानन मगदूम यांनीही मोर्चेबांधणी केली होती. कुपवाडला धनपाल खोत वगळता एकालाही सभापतिपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे मगदूम यांनी सभापतीसाठी जोर धरला होता. त्यांना शेखर इनामदार यांचे पाठबळ होते.

बुधवारी सायंकाळी अचानकच मिरजेचे संदीप आवटी यांचे नाव समोर आले. भाजपच्या कोअर कमिटीने आवटी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची कुजबूज भाजप नगरसेवकांत सुरू झाली. आवटी यांनीही सभापतिपदासाठी इच्छा व्यक्त केली असली तरी, या गटाचा डोळा महापौरपदावर होता. त्यामुळे आवटी गट फार जोर करणार नाही, असा कयास लावला जात होता.

पण अखेरच्या क्षणी संदीप आवटी यांचे नाव चर्चेत आल्याने इतर इच्छुकांची धाकधुक वाढली. रात्री उशिरापर्यंत इच्छुकांनी नेते व कोअर कमिटी सदस्यांच्या भेटीगाठी व दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. आवटी यांचे नाव जाहीर झाल्यास माळी व मगदूम यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.नेत्यांनी हात झटकलेविधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यात इच्छुक नगरसेवकांची नाराजी नको, म्हणून नेत्यांनी सभापती पदाच्या निवडीपासून दूर राहणेच पसंत केले आहे. मंत्री सुरेश खाडे व आ. गाडगीळ यांनी निवडीची जबाबदारी कोअर कमिटीवर सोपविल्याचे समजते. निवडणुकीत आणखी नाराजी ओढवून घेण्याची मानसिकता नेत्यांची नाही.नाराजांवर विरोधकांचे लक्षस्थायी समितीत भाजपचे ९ व काँग्रेस-राष्ट्रवादीचे ७ सदस्य आहेत. भाजपमध्ये सभापती पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. इच्छुकांच्या हालचालींवर काँग्रेस व राष्ट्रवादीचे बारकाईने लक्ष आहे. सभापती पदाची संधी न मिळाल्यास फाटाफूट होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नाराजांना सोबत घेऊन स्थायीची सूत्रे हाती घेण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीनेही मोर्चेबांधणी केल्याचे समजते.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपा