शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

भाजपच्या कारभारावर प्रदेश समितीकडून नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 5:22 PM

महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभाराबाबत प्रदेश समितीकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सध्याच्या कारभाराबद्दल नेते व नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांसह कार्यकारिणीतील नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यात कोअर कमिटीच्या स्वहित कारभाराचा पंचनामा होऊ लागला आहे. त्यावरून प्रदेश पातळीवरील नेत्यांनीही पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याची चर्चा भाजप वर्तुळात सुरू आहे

ठळक मुद्देभाजपच्या कारभारावर प्रदेश समितीकडून नाराजीनेत्यांनीही पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याची चर्चा

शीतल पाटील सांगली : महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभाराबाबत प्रदेश समितीकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सध्याच्या कारभाराबद्दल नेते व नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांसह कार्यकारिणीतील नेत्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यात कोअर कमिटीच्या स्वहित कारभाराचा पंचनामा होऊ लागला आहे. त्यावरून प्रदेश पातळीवरील नेत्यांनीही पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याची चर्चा भाजप वर्तुळात सुरू आहे.महापालिकेच्या स्थापनेनंतर २० वर्षांनी भाजपला सत्तेची चव चाखता आली. महापालिका निवडणुकीत सांगलीच्या जनतेनेही भाजपवर विश्वास दाखवित बहुमत दिले. पण गेल्या दीड वर्षात भाजपला फारसा समाधानकारक कारभार करता आलेला नाही. त्यात अनेक मुद्द्यांवरून वादही निर्माण झाले. त्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपचा आलेख खालावला.

महापालिका क्षेत्रातील सांगली व मिरज हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपने राखले असले तरी, पक्षाला मिळालेले मताधिक्य चिंतेचा विषय ठरले होते. सांगलीत केवळ सात हजार, तर मिरजेत ३० हजाराचे मताधिक्य मिळाले. दोन्ही मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार नसताना काँग्रेसने दिलेल्या लढतीमुळे भाजप नेत्यांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. या साºया गोष्टीला आता महापालिकेचा कारभारच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.गेल्या दीड वर्षात कोट्यवधीची कामे झाली. त्याचे चांगले मार्केटिंगही भाजपने केले. तरीही मताधिक्य कमी का? असा प्रश्न भाजप प्रदेश समितीलाही पडला आहे. त्यातून काही नगरसेवकांसह भाजप नेत्यांनी महापालिकेच्या कारभाराबद्दल थेट प्रदेश समितीकडेच तक्रारी केल्या आहेत.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही काहींनी प्रत्यक्ष भेटून, महापालिकेविरोधात तक्रार केली. राज्यातील सत्ता गमाविल्यानंतर सावध झालेल्या भाजपने काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व महापालिकांच्या सभागृह नेत्यांची बैठक मुंबईत बोलाविली होती. या बैठकीतही इतर महापालिकेतील कारभारापेक्षा, सांगली महापालिकेच्या कारभाराचीच चर्चा झाल्याचे समजते. त्यातून काही पदाधिकाऱ्यांची प्रदेश समितीच्या नेत्यांनी कानउघाडणी केली आहे.महापालिकेचा कारभार हाकण्यासाठी भाजपने कोअर कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीला पदाधिकारी निवडीपासून ते संपूर्ण कारभार पाहण्याचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. पण कोअर कमिटीतील बहुतांश नेतेमंडळी आपल्या स्वकीयांनाच पदे देण्यात आघाडीवर आहेत.

जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोअर कमिटीतील नेते कधीच आक्रमक झाल्याचे दिसून आलेले नाहीत. स्वहिताला प्राधान्य देण्याऱ्या कोअर कमिटीच्या कारभाराबद्दलही प्रदेश समितीकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपाSangliसांगली