शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

काळ्या खणीची फाईल गहाळ

By admin | Published: June 22, 2015 11:58 PM

फेरप्रस्तावाची तयारी : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे पत्र

सांगली : केंद्रीय तलाव संवर्धन योजनेअंतर्गत महापालिकेने महाआघाडीच्या सत्ताकाळात सादर केलेली काळी खण सुशोभिकरणाची फाईल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातून गहाळ झाली आहे. पर्यावरण मंत्रालयाने याबाबत महापालिकेला पत्र पाठविले असून, योजनेअंतर्गत पुन्हा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे. महाआघाडी सत्तेवर असताना याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. शहरातील पुष्पराज चौकाजवळ सुमारे १० हेक्टर क्षेत्रात काळी खण असून या तलावाचे संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय तलाव संवर्धन विभागाकडे सुरुवातीला २२ कोटींचा प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला केंद्राने प्राथमिक मान्यताही दिली, पण न्यायालयीन वादामुळे महापालिकेला निधी प्राप्त होऊ शकला नाही. त्या प्रकल्पाचे २७ कोटींचे दुरूस्ती अंदाजपत्रक केंद्राला सादर झाले. या प्रस्तावाला राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली होती. केंद्रातील सरकार बदलल्यानंतर महापालिकेने या प्रकल्पाबाबत स्मरणपत्र पाठविले होते. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे एक पत्र महापालिकेत सोमवारी आल्यानंतर महापालिकेला धक्का बसला. मंत्रालयातील काळ््या खणीची फाईलच हरविल्याचा उल्लेख या पत्रात होता. महापालिकेला फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याने आता कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. मंत्रालयातील फाईल गहाळ झाल्याने आता पुन्हा या फायलीचा प्रवास मंजुरीच्या सर्व टप्प्यांमधून होणार आहे. (प्रतिनिधी)विघ्न संपता संपेना!गेल्या दहा वर्षांपासून काळी खण सुशोभिकरणासाठी धडपड सुरू आहे. पण सातत्याने या प्रयत्नांत विविध कारणांनी अडथळे आले. काळी खण सुशोभिकरणाची ही विघ्नमालिका आजअखेर कायम आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात काळी खण सुशोभिकरणाची चर्चा सुरू झाली. त्याकाळी विरोधी संभाजी पवार गटाने या प्रस्तावावर उपहासात्मक टीका केली होती. त्यानंतर काळ्या खणीची जागा नेमकी कोणाची, यावरून वाद सुरू झाले. महापालिका आणि गणपती पंचायतन यांच्यात न्यायालयीन वाद होता. त्यामुळे केंद्राकडे गेलेला प्रस्ताव त्यावेळी नामंजूर झाला होता.