लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : कोकरुड (ता. शिराळा) पोलीस स्टेशनने परिसरात संचारबंदीची कडेकोट अंमलबजावणी सुरू केली आहे. कोकरूड फाटा या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी नाकाबंदी दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या एकूण सात वाहनचालकांवर कारवाई करून त्यांची वाहने जप्त केली आहेत. विनामास्क फिरणाऱ्या एकूण सतराजणांवर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून दुकाने चालू ठेवल्याबद्दल आरळा येथील अभिमन्यू मोबाईल शॉपी, चौगुले इलेक्ट्रॉनिक्स या दोन दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यापुढे देखील संचारबंदी आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन, कोकरूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी केले आहे.